इंग्लंडचा क्लब क्रिकेटपटू ख्रिस हॉलिडेने ११३ चेंडूंचा सामना करत ३१६ धावांची तुफान त्रिशतकी खेळी केली होती. त्याने ही खेळी करताना २१ चौकार आणि ३४ षटकारही ठोकले. त्याच्या या खेळीमुळे त्याचा संघ होयलँडस्वाइनने डेनबी क्रिकेट क्लबला तब्बल ३७८ धावांच्या फरकाने पराभूत केले होते. ख्रिस सोबतच या सामन्यात एसपी सिंगनेही ४६ चेंडूत २ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने ६२ धावांची अर्धशतकी खेळी केली. या दोन्ही फलंदाजांनी धडाकेबाज फलंदाजी करत विरोधी संघाच्या गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला.
हा सामना हडर्सफील्ड क्रिकेट लीगचा भाग होता, जिथे ७ ग्रूप बनविण्यात आले होते. यामधील पहिले ६ ग्रूप २०१९ मध्ये त्यांच्या स्थितीमुळे बनविण्यात आले होते, तर ७ वा ग्रूप कोरोना व्हायरसमुळे मैदानाच्या उपलब्धतेच्या कमतरतेमुळे बनविला होता.
विशेष म्हणजे ख्रिसने इतकी चांगली खेळी करूनही त्याला सोशल मीडियावर चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. चाहत्यांनी म्हटले की, त्याने खूप धावा केल्यानंतर निवृत्त झाले पाहिजे होते. परंतु ख्रिसने याबाबत बोलताना म्हटले की, त्याला आपली खेळी पुढे खेळण्यास सांगितले होते.
ख्रिसने म्हटल्यानुसार डीएनएने सांगितले की, “मी निवृत्ती घेण्याची ऑफर संघापुढे ठेवली होती. परंतु संघाकडूनच मला पुढे खेळण्यास सांगण्यात आले होते. जेव्हा मी २०० धावा पूर्ण केल्या, तेव्हा बाऊंड्रीवरून मला सांगण्यात आले की, विक्रमासाठी केवळ ८० धावांची आवश्यकता आहे. मला याबाबत कोणतीच कल्पना नव्हती आणि हे माझ्या डोक्यातही नव्हते.”
त्याचबरोबर दुसरीकडे त्याचा विरोधी संघ डेनबीने त्याच्या या खेळीसाठी स्वत:ला दोष दिला. कारण ख्रिसचा झेल ११० धावांवर असताना सुटला होता. तरीही हा सामना कोविड-१९ मुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनपूर्वी झाला होता. इंग्लंडमध्येही मार्चनंतर क्रिकेट पूर्णपणे ठप्प झाले होते. त्यानंतर जुलैपासून तिथे क्रिकेटला सुरुवात झाली तसेच इंग्लंड आणि वेस्ट इंडिज संघातील ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन झाले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
-रोहित शर्मासह या ५ खेळाडूंना मिळणार राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार
-‘मला रोहित नाही तर विराटसोबत खेळायला अधिक आवडते,’ ‘या’ वेगवान गोलंदाजाचा खुलासा
-चांगल्या कामगिरीसाठी कुणीही ठरु शकतं प्रेरणा, या क्रिकेट संघाची प्रेरणा ठरतेय तुर्की ब्लॉकबस्टर
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएल२०२० : आरसीबीच्या या ३ खेळाडूंना कदाचित मिळणार नाही एकाही सामन्यात खेळण्याची संधी
-आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळताना फ्लॉप ठरलेले ३ टी२० क्रिकेटमधील दिग्गज
-५ वेळा क्रिकेट इतिहासात गोलंदाज झाले ओपनर, केल्या धमाकेदार खेळी