Loading...

सर्कल प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा; पी.पी. रॉयल्स आणि पुष्पांजलीमध्ये रंगणार अंतिम लढत

पुणे । पुष्पांजली सुपर स्ट्रायकर्स आणि पी. पी. रॉयल्स यांच्यात गॅलेक्सी सर्कल प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेची अंतिम लढत रंगणार आहे. मुकुंदनगर येथील कटारिया हायस्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील पहिल्या उपांत्य लढतीत पी. पी. रॉयल्स संघाने पद्मावती रॉयल्स संघावर सात गडी राखून मात केली.

पद्मावती रॉयल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना १२ षटकांत ५ बाद ११० धावा केल्या. यात ललित ओसवालने ४२ चेंडूंत ६४ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरादाखल पी. पी. रॉयल्स संघाने विजयी लक्ष्य ११ षटकांत तीन गडींच्या मोबदल्यात सहज साध्य केले. दुस-या उपांत्य लढतीत पुष्पांजली सुपर स्ट्रायकर्स संघाने ओशोरा संघावर १२ धावांनी विजय मिळवला.

पुष्पांजली सुपर स्ट्रायकर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १०४ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना ओशोरा संघाला ९ बाद ९२ धावाच करता आल्या. यात पुष्पांजलीच्या नीरज मुनोतने एकाच षटकात तीन फलंदाज बाद केले.

संक्षिप्त धावफलक –

१) पद्मावती रॉयल्स – १२ षटकांत ५ बाद ११० (ललित ओसवाल ६४, श्रीनिवास मुंदडा २६ विजय राठोड २६, २-२७, महावीर व्होरा १-७, सुनील कारवा १-२०) पराभूत वि. पी. पी. रॉयल्स – ११ षटकांत ३ बाद १११ (विजय राठोड २९, अभय व्होरा २७, कपिल तपाडिया २-४२, देवांग काब्रा १-२१).

२) पुष्पांजली सुपर स्ट्रायकर्स – १२ षटकांत ६ बाद १०४ (सुनील बहेती ३९, सुदर्शन बिहानी २६, पवन धूत २-१३, प्रमोद दुबे १-२८, रितेश चंडाक १-२०) वि. वि. ओशोरा – १२ षटकांत ९ बाद ९२ (प्रमोद दुबे २६, रितेश चंडाक २०, नीरज मुनोत ३-३, राहुल राठी २-१७, सुनील बहेती १-६, )

You might also like
Loading...