इंडियन सुपर लीग (आयएसएल)2022-23मधील मॅच वीक-15मधील सॅटर्डे स्पेशल (14 जानेवारी) पहिल्या लढतीत श्री कांतीरावा स्टेडियमवर बंगळूरू एफसीने ओडिशा एफसीवर 3-1 असा विजय मिळवला. हंंगामातील सहाव्या विजयासह यजमानांनी प्ले-ऑफ फेरीच्या आशा कायम ठेवल्या.
पूर्वार्धावर यजमानांनी निर्विवाद वर्चस्व राखले. त्याचे क्रेडिट रोहित कुमार आणि रॉय क्रिष्णा कुमार यांना जाते. दोघांनी अनुक्रमे 25व्या आणि 28व्या मिनिटाला अप्रतिम गोल करताना बंगळूरूला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. 3-5-2 अशा फॉर्मेशनने खेळणार्या यजमानांनी आक्रमक सुरुवात केली. प्रतिस्पर्धी ओडिशा संघानेही चांगला खेळ केला. मात्र, 25व्या मिनिटाला पाहुण्यांचा बचाव भेदण्यात बंगळूरूला यश आले. अलॅन कोस्टाच्या मदतीने रोहित कुमारने यजमानांचे गोलखाते उघडले. यानंतर त्यांच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला.
रोहितच्या गोलने आत्मविश्वास उंचावलेल्या बंगळूरुला तीन मिनिटांच्या फरकाने आणखी एक संधी मिळाली. रॉय क्रिश्नाने सिवा नारायननला डाव्या बाजूने एक सुरेख पास दिला. त्यानंतर दोघांनी सुरेख ताळमेळ राखताना ओडिशा एफसीच्या पेनल्टी क्षेत्रात धडक मारली. प्रतिस्पर्ध्यांच्या कमकुवत बचावाचा फायदा उठवत नारायणन याच्या पासवर रॉय क्रिष्ना याने उजव्या कॉर्नरवरून चेंडूला अचूक गोलजाळ्यात धाडले आणि बंगळूरूला 2-0 असे आघाडीव नेले. मध्यंतरापर्यंत ही आघाडी टिकवून ठेवण्यात यजमानांना यश आले.
THREE GOALS. THREE POINTS. COME ON, BFC! ⚡️#WeAreBFC #BFCOFC #NothingLikeIt pic.twitter.com/CsTpcJlj5a
— Bengaluru FC (@bengalurufc) January 14, 2023
दुसर्या सत्रात पाहुण्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. 50व्या मिनिटाला पेनल्टी क्षेत्रात चेंडूवर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात गुरप्रीत संधू याने दिएगो मॉरिसियाला खाली पाडले. त्यामुळे रेफ्रींनी ओडिशा एफसीला पेनल्टी बहाल केली. मॉरिसिओ याने पेनल्टीचा फायदा उठवत यजमानांची आघाडी कमी केली. शेवटच्या अर्ध्या तासात दोन्ही संघाने बेंचवरील खेळाडूंना संधी दिली. इंज्युरी टाइममध्ये पॅब्लो पेरेझ याने वैयक्तिक पहिला आणि क्लबसाठी तिसरा गोल केला. ओडिशाला मध्यंतरानंतर एक गोल करण्यात यश आले तरी बंगळूरूसाठी पूर्वार्धातील आघाडी निर्णायक ठरली.
ओडिशाविरुद्धच्या विजयानंतर बंगळूरूचे 15 सामन्यांतून 19 गुण झालेत. हा त्यांचा पाचवा विजय आहे. दुसरीकडे, ओडिशाच्या खात्यात 14 सामन्यांतून 22 गुण झालेत. त्यांचा हा सहावा पराभव आहे.
निकाल- बंगळुरू एफसी-3 (रोहित कुमार 25व्या मिनिटाला, रॉय क्रिष्णा कुमार 28व्या मिनिटाला, पॅब्लो पेरेझ 90+3व्या मिनिटाला) विजयी वि. ओडिशा एफसी-1(दिएगो मॉरिसिओ 50व्या मिनिटाला-पेनल्टी)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीचं ‘असं’ कौतुक आजपर्यंत कुणीही केलं नसेल, वाचा ‘माही’च्या प्रभावाबाबत काय म्हणाला दिग्गज खेळाडू
एका षटकात शेफालीने भारतासाठी सोपा केला विजय, 19 वर्षांखालील महिला विश्वचषकात भारताचा पहिला विजय