fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

पीवायसी-गोल्डफिल्ड-मांडके चषक क्रिकेट स्पर्धेत क्लब ऑफ महाराष्ट्र संघाचा व्हेरॉक संघावर 20 धावांनी विजय

पुणे । पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी-गोल्डफिल्ड-मांडके चषक या सर्वातजुन्या व अनोख्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत नौशाद शेख याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर क्लब ऑफ महाराष्ट्र संघाने व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाचा 20 धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली.

पीवायसी हिंदू जिमखाना येथील क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या डावात व्हेरॉक संघ 22षटकात 4 बाद 155धावा अशा सुस्थित होता. तत्पूर्वी काल क्लब ऑफ महाराष्ट्र संघाने पहिल्यांदा खेळताना 38.4षटकात 301धावांचे लक्ष उभे केले होते. याच्या उत्तरात व्हेरॉक संघ 39.5षटकात 280धावावर संपुष्टात आला. यात 10गडी बाद झाल्याने व्हेरॉकची अंतिम धावसंख्या 230(वजा 50धावा) झाली.

यात ऋतुराज गायकवाडने 53धावा, विशाल गीतेने 58धावा, उत्कर्ष अगरवालने 81 धावांची खेळी केली. क्लब ऑफ महाराष्ट्र संघाकडून निकित धुमाळ(65-2), नौशाद शेख(50-2), प्रज्वल गुंड(54-3)यांनी सुरेख गोलंदाजी करत व्हेरॉक संघाला 230 धावांवर रोखले व पहिल्या डावात 71 धावांची आघाडी संघाला मिळवून दिली.

दुसऱ्या डावात क्लब ऑफ महाराष्ट्र 20षटकात 8बाद 227 धावा केल्या. पण त्यांचे 8 गडी बाद झाल्याने संघाची धावसंख्या 187धावा झाली व निर्धारित षटकात व्हेरॉक संघाला 258धावांचे आव्हान दिले. यात यश क्षीरसागर 61, देवदत्त नातू 43, सुरज शिंदे 41, नौशाद शेख 26, युवराज झगडे 20यांनी धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला. याच्या उत्तरात व्हेरॉक संघ 20षटकात 3बाद 238धावाच करू शकला. ऋतुराज गायकवाड याने एकाबाजूने लढताना 68 चेंडूत 10चौकार व 5षटकारांच्या मदतीने 124 धावांची तुफानी फलंदाजी केली.

ऋतुराज गायकवाड(124धावा) व विनय पाटील(84धावा) यांनी धावा काढून संघाला विजयाच्या जवळ आणले. व्हेरॉकला विजयासाठी 15चेंडूत 33 धावांची गरज असताना प्रज्वल गुंड याने ऋतुराजला पायचीत बाद करून सामन्याला कलाटणी दिली. क्लब ऑफ महाराष्ट्र संघाकडून निकित धुमाळ(31-1), प्रज्वल गुंड(36-1), आतिफ सय्यद(70-1)यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. सामन्याचा मानकरी नौशाद शेख ठरला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: क्लब ऑफ महाराष्ट्र: 38.4षटकात सर्वबाद 301धावा(351-50धावा=301धावा)(नौशाद शेख 127(85,11×4,6×6), सुजित उबाळे 86(79,9×4,1×6), यश क्षीरसागर 47(57), देवदत्त नातू 43(44), शुभम तैस्वाल 6-51-4, मनोज यादव 6.4-58-2, विशाल गीते 8-66-2, कार्तिक पिल्ले 7-51-2) वि.व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 39.5षटकात सर्वबाद 230धावा(280-50धावा)(ऋतुराज गायकवाड 53(42,4×4), विशाल गीते 58(34), उत्कर्ष अगरवाल 81(110), निकित धुमाळ 8-65-2, नौशाद शेख 8-50-2, प्रज्वल गुंड 7-54-3); पहिल्या डावात क्लब ऑफ महाराष्ट्र संघाकडे 71धावांची आघाडी;

दुसरा डाव: क्लब ऑफ महाराष्ट्र: 20षटकात 8बाद 187धावा(227-40धावा)(यश क्षीरसागर 61(53,3×4, 1×6), देवदत्त नातू 43(29), सुरज शिंदे 41(15), नौशाद शेख 26(20), युवराज झगडे 20(28), शुभम तैस्वाल 4-48-2, अॅलन रॉड्रिगेस 4-30-2, विशाल गीते 4-47-1)वि.वि.व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 20षटकात 3बाद 238धावा(253-15धावा)(ऋतुराज गायकवाड 124(68,10×4,5×6), विनय पाटील 84(59,4×4,4×6), विशाल गीते 28(17), निकित धुमाळ 4-31-1, प्रज्वल गुंड 3-36-1, आतिफ सय्यद 4-70-1);सामनावीर-नौशाद शेख; क्लब ऑफ महाराष्ट्र 20 धावांनी विजयी.

आगामी सामना(बुधवार, 15 व गुरुवार 16 मे 2019)
व्हेरॉक वि.केडन्स (व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी, थेरगाव)

You might also like