पुणे| पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित चौथ्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक निमंत्रित 19 वर्षाखालील गटाच्या तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत पहिल्या सामन्यात हमझा सय्यद(17धावा व 4-44)याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर क्लब ऑफ महाराष्ट्र संघाने केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा 33धावांनी पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात टिळक जाधव(37धावा व 2-31) याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने पुना क्लबचा 177 धावांनी पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना मैदानावरील तीन दिवसीय सामन्यात तिसऱ्या दिवशी क्लब ऑफ महाराष्ट्र संघाचा आज 33षटकात 5बाद 80धावापासून खेळ पुढे सुरु झाला. तत्पूर्वी पहिल्या डावात केडन्स संघाने क्लब ऑफ महाराष्ट्र संघाविरुद्ध 67 धावांची आघाडी घेतली होती व हि आघाडी भरून काढत दुसऱ्या डावात क्लब ऑफ महाराष्ट्र 71.2षटकात सर्वबाद 189धावा केल्या. यात सारिश देसाईने 93चेंडूत 9चौकारांसह 61 धावांची संयमी खेळी केली. त्याला हमझा सय्यदने 17 धावा काढून साथ दिली. यांनी सहाव्या गड्यासाठी 58चेंडूत 43धावांची भागीदारी केली. त्यानंतर सौरभ दरेकर 29, केदार बजाज 27, अभिनव तिवारी 15 यांनी धावा काढून केडन्स संघापुढे विजयासाठी 122 धावांचे आव्हान समोर ठेवले. केडन्सकडून आर्य जाधवने 56 धावात सर्वाधिक 4 गडी बाद केले. या आव्हानाचा पाठलाग करताना क्लब ऑफ महाराष्ट्रच्या हमझा सय्यद(4-44), शुभम मेड(3-28), सारिश देसाई(2-7) यांनी केलेल्या अचूक गोलंदाजीपुढे केडन्स संघाचा डाव 30.4 अवघ्या 89धावावर कोसळला. यात मोहम्मद अरकम सय्यद 24, प्रद्युम्न चव्हाण 20, दिग्विजय पाटील 12, सोहम सरवदे 12 यांनी थोडासा प्रतिकार केला. सामनावीर हमझा सय्यद ठरला.
आर्यन्स क्रिकेट मैदानावरील तीन दिवसीय सामन्यात तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाच्या आज दिवसाखेर 36षटकात 4बाद 148धावापासून सुरुवात झाली. तत्पूर्वी व्हेरॉक संघाने पूना क्लबविरुद्ध 99 धावांची आघाडी मिळवली होती. आज व्हेरॉक संघाने 54.5षटकात सर्वबाद 217धावा केल्या. यात यश 46, सुरज गोंड 32, टिळक जाधव 37, ओंकार राजपूत 26, नारायण डोके 17, ओम भाबड 10 यांनी धावा काढून संघाला 316 धावांचे आव्हान उभे केले. पूना क्लबकडून अखिलेश गवळी(3-54), अश्कन काझी(2-33), सागर मल्लपट्टी(2-20), राजमंथन काळे(2-60) यांनी सुरेख गोलंदाजी केली. विजयासाठी 316 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या पूना क्लबचा डाव 41.2षटकात 139 धावावर संपुष्टात आला. यात अश्कन काझी 36, हर्ष ओसवाल 22, क्रिश शहा 16, अखिलेश गवळी 15 यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. व्हेरॉक संघाकडून रोहित चौधरी(3-37), टिळक जाधव(2-31), हर्षवर्धन पवार(2-23) यांनी शिस्तबद्ध गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. सामनावीर टिळक जाधव ठरला
स्पर्धेचा पहिला उपांत्य फेरीचा सामना 25,26,27 ऑक्टोबर या दिवशी ब्रिलियंटस स्पोर्ट्स अकादमी व युनायटेड स्पोर्ट्स क्लब यांच्यात ब्रिलियंटस स्पोर्ट्स अकादमी मैदानावर होणार आहे.
सामन्याचा निकाल:
पीवायसी मैदान: पहिला डाव: क्लब ऑफ महाराष्ट्र: 69.1 षटकात सर्वबाद 199 धावा वि.केडन्स क्रिकेट अकादमी: 74.5 षटकात सर्वबाद 266धावा ; पहिल्या डावात केडन्स संघाकडे 67 धावांची आघाडी;
दुसरा डाव: क्लब ऑफ महाराष्ट्र: 71.2षटकात सर्वबाद 189धावा(सारिश देसाई 61(93,9×4), सौरभ दरेकर 29(52), केदार बजाज 27, हमझा सय्यद 17, अभिनव तिवारी 15, आर्य जाधव 56-4, शुभम खरात 2-49, प्रद्युम्न चव्हाण 2-18, रझिक फल्ला 20-1, मोहम्मद अरकमी सय्यद 14-1) वि.वि.केडन्स: 30.4 सर्वबाद 89धावा(मोहम्मद अरकम सय्यद 24(61), प्रद्युम्न चव्हाण 20(39), दिग्विजय पाटील 12, सोहम सरवदे 12, हमझा सय्यद 4-44, शुभम मेड 3-28, सारिश देसाई 2-7);सामनावीर-हमझा सय्यद; क्लब ऑफ महाराष्ट्र संघ 33धावांनी विजयी;
आर्यन्स क्रिकेट मैदान: पहिला डाव: व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 62षटकात सर्वबाद 246 धावा वि.पूना क्लब: 70.3षटकात सर्वबाद 147 धावा; व्हेरॉक संघाकडे पहिल्या डावात 99 धावांची आघाडी;
दुसरा डाव: व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 54.5षटकात सर्वबाद 217धावा(यश 46(51,9×4), सुरज गोंड 32(34,3×4,2×6), टिळक जाधव 37(77,4X4), ओंकार राजपूत 26(29), नारायण डोके 17, ओम भाबड 10,अखिलेश गवळी 3-54, अश्कन काझी 2-33, सागर मल्लपट्टी 2-20, राजमंथन काळे 2-60) वि.वि.पूना क्लब: 41.2षटकात सर्वबाद 139 धावा(अश्कन काझी 36(51,8×4), हर्ष ओसवाल 22(44), क्रिश शहा 16, अखिलेश गवळी 15, रोहित चौधरी 3-37, टिळक जाधव 2-31, हर्षवर्धन पवार 2-23);सामनावीर-टिळक जाधव; व्हेरॉक संघ 177 धावांनी विजयी.
महत्त्वाच्या बातम्या-
पुणे जिल्हा अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत अर्जुन वेल्लूरीचा मानांकित खेळाडूवर विजय
याला म्हणतात आदर! इतिहास रचल्यानंतर हात बांधून मेन्टॉर धोनीपुढे उभे राहिले पाकिस्तानचे खेळाडू- VIDEO