fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

राहुल द्रविडला हितसंबंधाच्या प्रकणात मिळाला मोठा दिलासा

बीसीसीआयसाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमुन दिलेल्या समीतीने(सीओए) स्पष्ट केले आहे की भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडच्या बाबतीत परस्पर हितसंबंधाचा मुद्दा येत नाही. द्रविडला काही दिवसांपूर्वीच बंगळूरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख करण्यात आले होते.

पण द्रविड आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्सची मालकी असलेल्या इंडिया सिमेंटमध्ये उपाध्यक्ष असल्याने मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे सदस्य संजीव गुप्ता यांनी परस्पर हितसंबंधाबद्दल तक्रार केली होती.

त्यानंतर बीसीसीआयचे लोकपाल तसेच एथिक्स ऑफिसर सेवानिवृत्त न्यायाधीश डीके जैन यांनी द्रविडला परस्पर हितसंबंध असल्याची नोटीस पाठवली होती.

पण याबद्दल सीओएचे सदस्य रवी थोडगे यांनी सांगितले की ‘राहुलच्या प्रकरणात कोणतीही समस्या नाही. त्याला नोटीस मिळाली आहे आणि आम्ही त्याची नियुक्ती( राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख म्हणून) निश्चित केली आहे. आम्हाला परस्पर हितसंबंधाचा मुद्दा यामध्ये आढळून आला नाही.’

‘जर लोकपालांना असे वाटते की इथे परस्पर हितसंबंधाचा मुद्दा आहे तर आम्ही आमचे मत स्पष्ट करु तसेच इथे परस्पर हितसंबंधाचा मुद्दा का नाही हे सांगू. यावर त्यांना विचार करावा लागेल. ही एक प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया पुढे चालू राहणार आहे.’

द्रविडने मंगळवारी सीओए सदस्यांची मुंबईत भेट घेत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत कोणत्या सुविधा हव्यात याबाबत चर्चा केली आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

४२वे वनडे शतक केल्यानंतर विराट कोहलीचे़ गांगुलीने असे कले कौतुक…

आयपीएल २०२०मध्ये अजिंक्य रहाणे या संघाकडून खेळणार?

श्रेयस अय्यरबद्दल सुनील गावस्करांनी केले मोठे भाष्य

You might also like