२०१४ सालच्या भारताच्या इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेत विराट कोहलीची कामगिरी अत्यंत खराब झाली होती.
यामध्ये विराटने ५ कसोटी सामन्यांच्या १० डावात १३.४० च्या सरासरीने फक्त १३४ धावा केल्या होत्या.
मात्र १ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी जगभरातून अनेकजन २०१४ च्या कसोटी मालिकेतील विराटच्या कामगिरीकडे बोट करत, तो या मालिकेत चांगली कामगिरी करेल की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
मात्र विराटचे प्रशिक्षक राजकुमार शर्मांना मात्र विराट यावेळी इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी करेल यावर ठाम विश्वास आहे.
एका कार्यक्रमात बोलताना विराटचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी विराटच्या इंग्लंडमधील कामगिरी विषयी आपले मत व्यक्त केले.
“काही लोकांना वाटते की विराटला स्वत:ला सिद्ध करायचे आहे. मात्र त्याने स्वत:ला सिद्ध करायची काही गरज नाही. चार वर्षापूर्वीचा विराट आणि आताचा विराट यामध्ये जमिन आसमानचा फरक आहे. त्यानंतर विराटने त्याच्या कारकिर्दीत खूप काही पराक्रम केले आहेत.” असे मत विराटचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी मांडले.
२०१४ च्या इंग्लंड दौऱ्यात जेम्स अॅंडरसन विराटसाठी डोकेदुखी ठरला होता. त्याविषयीसुद्धा राजकुमार शर्मा यांनी आपले मत मांडले.
“विराट आता अँडरसनचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. इंग्लंड संघ जेव्हा भारत दौऱ्यावर आला होता त्यावेळी विराटने अँडरसनच्या विरुद्ध चांगली फलंदाजी केली होती.” असे राजकुमार शर्मा म्हणाले.
भारत-इंग्लंड याच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला १ ऑगस्टपासून बर्मिंघहम येथून सुरवात होत आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–गांगुलीला मागे टाकत कॅप्टन कोहली होणार नवा ‘दादा’?
–Video: हा २ वर्षांचा चिमुकला ठरला आयसीसीचा ‘फॅन आॅफ द विक’