जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यांमध्ये न्यूझीलंड संघाने भारतीय संघाचा 8 विकेटने पराभव केला. यामुळे भारतीय चाहते नाराज झाले आहेत. परंतु याच दरम्यान समालोचनामध्ये एक नवीन आवाज आपल्या सर्वांना ऐकायला मिळाला. तो आवाज म्हणजे यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक. दिनेश कार्तिकने फक्त भारतीय चाहत्यांची नव्हे तर संपूर्ण जगातील चाहत्यांची मने जिंकली आहेत.
दिनेश कार्तिक इंग्लिश मध्ये समालोचन करताना दिसून आला. दिनेश कार्तिक सोबत साऊथॅम्पटनमध्ये दिग्गज भारतीय दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर देखील समालोचन कक्षामध्ये उपस्थित होते. त्याचबरोबर पॅनलमध्ये इयान बिशप, इसा गुहा, नासिर हुसेन आणि मायकल आर्थरटन हे दिग्गज खेळाडू देखील उपस्थित होते.
चाहत्यांना दिनेश कार्तिकचे समालोचन खूप आवडले. त्यामुळे त्याचे कौतुक होत होते. दिनेश कार्तिकने समालोचन करताना त्याच्या जवळ असलेल्या माहितीचा वापर केलेला दिसला.
आता दिनेश कार्तिकने इंस्टाग्रामवर समालोचनाबद्दल कौतुक केल्याबद्दल चाहत्यांचे आभार मानले. त्याच्यासोबत दिनेश कार्तिकने लिहिले की, शब्दांमध्ये भावना व्यक्त केल्या जाऊ शकत नाही.
दिनेश कार्तिकने इंस्टाग्रामवर पोस्ट केले की, ‘मी हे शब्दात व्यक्त करू शकत नाही. तुम्हाला क्रिकेटमधील वेगळ्या बाजूचा अनुभव घेण्यासाठी मी हे पाऊल टाकले आहे. मी या प्रवासाच्या काही आठवणी तुमच्या सोबत शेअर करणार आहे. तुमच्या प्रेमामुळे आणि कौतुकामुळे मी हे सर्व काही करू शकलो. तुम्हा सर्वांना धन्यवाद आणि प्रेम.’
https://www.instagram.com/p/CQlfcReguE1/
याअगोदर दिनेश कार्तिकने एका मुलाखतीदरम्यान भारताच्या टी20 संघात पुनरागमन करण्याची आशा असल्याचे सांगितले. तो म्हणाला होता की, ‘मला असे वाटत आहे की जर तुम्ही माझ्या सामन्यांमधील योगदानाकडे लक्ष दिले, तर घरच्या मैदानावर, आयपीएलमध्ये आणि टी-20 या सर्व स्वरूपाकडे पाहिले तर मला खरंच हा विश्वास वाटतो की, मी टी20 संघामध्ये असले पाहिजे. बाकी सर्व संघाची निवड करण्यासाठी निवडकर्त्यांवर अवलंबून आहे. माझे असे मत आहे की, मी मधल्या क्रमांकावर मैदानात उतरलो तर मी संघासाठी महत्वाचे योगदान देऊ शकतो.’
महत्त्वाच्या बातम्या –
टेनिस चाहत्यांना मोठा झटका, ‘या’ स्टार खेळाडूची टोकियो ऑलम्पिकमधून माघार
सचिन तेंडूलकरनेही केले मान्य, WTC फायनलमध्ये टीम इंडियाची ‘या’ बाबतीत झाली चूक
नवीन संघ, नवीन कर्णधार आणि नवीन खेळाडू! ‘या’ कारणांसाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरेल श्रीलंका दौरा