Loading...

चौथ्या मालाज रवाईन रन माउंटन मॅरेथॉन २०१९ स्पर्धेचे आयोजन

पाचगणी। हॉटेल रवाईन यांच्या तर्फे व मालाज पुरस्कृत चौथ्या मालाज रवाईन रन माउंटन मॅरेथॉन 2019 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 21 व 22 सप्टेंबर 2019 या कालावधीत पाचगणी येथे ही मॅरेथॉन स्पर्धा पार पडणार आहे.

पाचगणी टेबललँड येथील संजीवन स्कुल येथुन या स्पर्धेला सुरूवात होईल. विशेष म्हणजे ‘स्टेअर वे टू रन’ या संकल्पने अंतर्गत स्पर्धेत अजय देसाई,सुशील शर्मा, युसुफ देवासवाला, विशाल गुलाटी, श्यामल मोंडल, सतनाम सिंग, अझिझ मास्टर, नरेश ठाकुर, मुरली पिल्ले, प्रिती मस्के हे 10 अल्ट्रा रनर धावपटू पुणे ते पाचगणी अशी 101 किलोमीटरची स्पर्धा पार करणार आहेत.

सह्याद्रीपर्वत रांगेतील कात्रज, खंबाटकी व पसरणी अशा तीन घाटरस्त्यावरून ही खडतर धाव हे दहा धावपटू पार करणार आहेत. सातारा हिल हाफ मॅरेथॉनचे संस्थापक डॉ. संदिप काटे यांची या स्पर्धेचे संचालक म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे. ही स्पर्धा 21 कि.मी(18 वर्षावरील), 10 कि.मी(16 वर्षावरील) आणि 5 कि.मी या प्रकारात पार पडणार आहे.

Loading...

स्पर्धेसाठी नावनोंदणी आवश्यक असून स्पर्धक आपली नावनोंदणी www.ravinerun.com अथवा www.TownScript.com या संकेत स्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

You might also like
Loading...