पुणे। पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे आयोजित अनोख्या व नाविन्यपूर्ण अशा पीवायसी रिबाऊंड रॅकेट लीग स्पर्धेत अंतिम फेरीत कुकरीज संघाने एक्सकॅलिबर्स संघाचा 12-10 असा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
पीवायसी हिंदू जिमखानाच्या टेबलटेनिस, टेनिस व बॅडमिंटन कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत कुकरीज संघाने एक्सकॅलिबर्स संघाचा 12-10 असा संघर्षपूर्ण पराभव केला. चुरशीच्या झालेल्या अंतिम फेरीच्या लढतीत पहिल्या टेबल टेनिस प्रकारात एक्सकॅलिबर्स संघाने कुकरीज संघाचा असा पराभव केला.
एक्सकॅलिबर्स संघाकडून शिरीष कर्णिक, संजय बामणे, उदय टेंबे, नितीन कोंकर, संकल्प गोयल, राधिका इंगळहळीकर, आनंद शहा, आर्य देवधर, गंगाधर देशपांडे, चैत्राली नवरे यांनी सुरेख कामगिरी बजावली.
त्यानंतर दुसऱ्या टेनिस प्रकारात अद्विक नाटेकर, रिया चाफेकर, केदार नाडगोंडे, राहुल गांगल, क्षितिज कोतवाल, आदित पाबळकर यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर कुकरीज संघाने एक्सकॅलिबर्स संघाचा 4-3 असा पराभव सामन्यातील आपले आव्हान कायम राखले.
निर्णायक लढतीत बॅडमिंटन प्रकारात कुकरीज संघाने एक्सकॅलिबर्स संघाचा 5-2 असा सहज पराभव करून विजेतेपदावर आपले नाव कोरले. कुकरीजकडून अनिश राणे, तेजस चितळे, अतुल बिनीवाले, तन्मय चोभे,अमोद प्रधान, केदार नाडगोंडे, देवेंद्र राठी, प्रांजली नाडगोंडे, क्षितिज कोतवाल, निखिल चितळे यांनी अफलातून कामगिरी बजावली.
स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक व आकर्षक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष डॉ.सुधीर भाटे, रिबाऊंड स्पोर्टसचे संचालक आलोक तेलंग, क्लबचे मानद सचिव आनंद परांजपे, लर्न पंकेट लँग्वेज अकादमीच्या ईशा श्रोत्री यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विनायक द्रविड, तुषार नगरकर, सारंग लागू, तन्मय आगाशे मान्यवर उपस्थित होते. सिद्धार्थ निवसरकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर सारंग लागू यांनी उपस्थितांचे आभार मानले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी:
कुकरीज वि.वि.एक्सकॅलिबर्स 12-10
टेबल टेनिस:
कुकरीज पराभूत वि.एक्सकॅलिबर्स 3-5(तन्मय चितळे/सचिन बेलगलकर वि.वि.अभिषेक ताम्हाणे/मधुर इंगळहळीकर 30-19; अतुल बिनीवाले/किरण गर्गे पराभूत वि.शिरीष कर्णिक/संजय बामणे 18-30; अतुल ठोंबरे/तन्मय चोभे पराभूत वि.उदय टेंबे/नितीन कोंकर 20-30; केदार नाडगोंडे/अनिश राणे पराभूत वि.संकल्प गोयल/राधिका इंगळहळीकर 28-30; राहुल गांगल/मनीष शहा पराभूत वि.आनंद शहा/आर्य देवधर 20-30; निखिल चितळे/क्षितिज कोतवाल वि.वि.अनुज साबडे/रोहन दळवी 30-27; अमोद प्रधान/गौरव भगत वि.वि.मनीषा घैसास/समीर जालन 30-23; अद्विक नाटेकर/कपिल त्रिमल पराभूत वि.गंगाधर देशपांडे/चैत्राली नवरे 19-30);
टेनिस:
कुकरीज वि.वि.एक्सकॅलिबर्स 4-3(तनया गोसावी/अजिंक्य मुथा पुढे चाल वि. अभिषेक ताम्हाणे/मधुर इंगळहळीकर 00-30; गौरव भगत/अभिजित गानू पराभूत वि.रोहन दळवी/संतोष शहा 29-30; अद्विक नाटेकर/रिया चाफेकर वि.वि.अनुज साबडे/नकुल फिरोदिया 30-21; केदार नाडगोंडे/राहुल गांगल वि.वि.विलास जावडेकर/नेहा ताम्हाणे 30-21; तन्मय चोभे/मधुरा टेंबे पुढे चाल वि.भाग्यश्री देशपांडे/विनोद इंगळे 30-00; क्षितिज कोतवाल/आदित पाबळकर वि.वि.आमिर आजगांवकर/आनंद शहा 20-17; प्रांजली नाडगोंडे/अनिष राणे पराभूत वि.अभय माळी/आर्य देवधर 16-20);
बॅडमिंटन:
कुकरीज वि.वि.एक्सकॅलिबर्स 5-2(अनिश राणे/तेजस चितळे वि.वि. आर्य देवधर/राधिका इंगळहळीकर 30-16; अतुल बिनीवाले/तन्मय चोभे वि.वि.चैत्राली नवरे/नितीन कोंकर 30-16; अमोद प्रधान/केदार नाडगोंडे वि.वि.आकाश सूर्यवंशी/मधुर इंगळहळीकर 30-28; अजिंक्य मुठे/मनीष शहा पराभूत वि.आनंद शहा/समीर जालन 00-30; चिन्मय चिरपुटकर/कपिल बाफना पराभूत वि.अभिषेक ताम्हाणे/गंगाधर देशपांडे 22-30; देवेंद्र राठी/प्रांजली नाडगोंडे वि.वि.अनुज साबडे/ईशान लागू 30-25; क्षितिज कोतवाल/निखिल चितळे वि.वि.आमिर आजगांवकर/मिथाली कुलकर्णी 30-26).
इतर पारितोषिके:
मोस्ट स्पोर्टींग टीम: कुकरीज;
मोस्ट डिसिप्लिन टीम: तलवार्स;
मोस्ट ग्लॅमरस टीम: सेबर्स;
जास्तीत जास्त टाय जिंकणारा संघ: कुकरीज;
सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू: प्रांजली नाडगोंडे;
सर्वोत्कृष्ट युवा खेळाडू: अद्विक नाटेकर व निखिल चितळे;
सर्वोत्कृष्ट वरिष्ठ खेळाडू: डॉ. अतुल बिनीवाले;
मोस्ट स्टायलिश खेळाडू: अंकित दामले;
क्राउड फेव्हरेट खेळाडू: डॉ.अभय जमेनीस;
सर्वोत्कृष्ट जोडी: मधुर व राधिका इंगळहळीकर;
मोस्ट इम्पॅकट खेळाडू: अभिषेक ताम्हाणे;
प्लेयर ऑफ द टूर्नामेंट: केदार नाडगोंडे.