आयसीसीने जगभरातील क्रिकेट पुन्हा सुरु करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना दिल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून क्रिकेटपटू लगेच मैदानावर उतरले आहेत. घेवरा आणि एमसीजी मदनपूरबरोबरच दिल्लीच्या अनेक मैदानांवर सामने खेळण्यात आले.
घेवरा मैदानावर (Ghevra Stadium ) सामन्यांचे आयोजक सुरेंद्र डबास (Surener Dabas) यांनी सांगितले की, हा कोणत्याही लीग किंवा स्पर्धेचा सामना नसून विकेंडला खेळला जाणारा मैत्रीपूर्ण सामना होता.
या सामन्यात संपूर्ण मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात आले. ते म्हणाले की, “नाणेफेकीसाठी वापरण्यात आलेले नाणे आणि चेंडूपासून बाथरूम तसेच प्रत्येक वस्तू सॅनिटाईज करण्याची व्यवस्था होती. आमचा हेतू सर्व सावधगिरी बाळगून मैदानावर उतरण्याचा होता. खेळाडूंना मैदानावर पुनरागमन करायचे आहे. तसेच ज्यांचे कुटुंब क्रिकेटच्या आधारे चालते त्यांचेही हेच मत आहे.”
पंचांचे काम झाले आव्हानात्मक-
“नवीन नियमांबरोबर पंचांचे काम आणखी आव्हानात्मक झाले आहे. खेळाडूंना आधीच सर्व नियम सांगण्यात आले होते. चेंडूला सॅनिटाईज करत राहण्याव्यतिरिक्त सेलिब्रेशन न करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. खेळपट्टीवरील दोन्हीही बाजूंना नवीन चेंडू सोपविण्यात आले होते. तसेच प्रत्येक षटकानंतर चेंडू सॅनिटाईज केले जात होते,” असे सामन्यात पंचाचे काम करणारे नवीन श्रीवास्तव (Naveen Srivastava) यांनी सांगितले.
“हे कोणतेही व्यावसायिक क्रिकेटपटू नव्हते. त्यामुळे त्यांना चेंडूवर लाळ किंवा थुंकी लावण्याची वेळ आली नाही,” असे चेंडूवर लाळ लावण्याच्या प्रश्नावर बोलताना श्रीवास्तव म्हणाले.
घरातून आणण्यात आले पाणी-
“सर्व खेळाडू आपापल्या घरून पाणी आणि जेवण घेऊन आले होते. कोणीही आपल्या वस्तू एकमेकांमध्ये वाटल्या नाहीत. आम्हाला खेळायचे होते तसेच एक संदेश द्यायचा होता की नवीन नियमांचे पालन करत सहजपणे सामना खेळला जाऊ शकतो,” असे एमसीजी-१ वर खेळण्यात आलेल्या सामन्यात सर्वाधिक ३२ धावा करणाऱ्या नवीनने म्हटले.
ट्रेंडिंग घडामोडी-
-बापरे! सामन्यात तब्बल ८ षटकार ठोकूनही संघ झाला पराभूत…
-पुन्हा सुरू झाले क्रिकेट, पहिल्याच सामन्यात पाहायला मिळाली जबरदस्त हॅट्रिक
-हा परदेशातील खेळाडू तासंतास पहातो धोनीच्या फलंदाजीचे व्हीडिओ