क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे असे म्हटले जाते. या खेळात कधी काय घडेल सांगता येत नाही. क्रिकेटपटू मैदानात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत चाहत्यांचे मनोरंजन करत असतात. तर अनेक खेळाडू आपल्या आगळ्या वेगळ्या सेलिब्रेशनमुळे चर्चेत असतात. असे असंख्य व्हिडिओ रोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. परंतु अनेकदा क्रिकेटपटूंच्या नकळत असा मजेशीर किस्सा घडतो, ज्यामुळे खेळाडूंना आणि क्रिकेट रसिकांना हसू आवरत नाही. असाच एक मजेशीर किस्सा, काउंटी क्रिकेट स्पर्धेत घडला आहे.
काउंटी क्रिकेट २०२१ स्पर्धेच्या हंगामात कॅंटबरी येथे केंट आणि ग्लॅमरगन यांच्यात सामना खेळला जात होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मायकेल नेसर याने डावातील २८ वे शतक टाकले होते आणि इंग्लंडचा फलंदाज सॅम बिलिंग्ज फलंदाजी करीत होता. सॅम बिलिंग्जने फाईन लेगच्या दिशेने शॉट खेळला आणि एक धाव पूर्ण केली. त्यावेळी क्षेत्ररक्षकाने यष्टीरक्षकाच्या दिशेने चेंडू फेकला.
परंतु यष्टीरक्षक ख्रिस कुकला ठाऊकच नव्हते की, त्याच्या मागे यष्टी आहे. यष्टीरक्षक ख्रिस कुकने चपळाईने चेंडू पकडला. परंतु तो चेंडू पडकताना यष्टीला लागून आदळला आणि जमिनीवर पडला. तो पडल्याने तेथे असलेल्या दोन यष्ट्या उखडल्या गेल्या. हा मजेदार क्षण पाहून मैदानात उपस्थित सर्व खेळाडू आनंदाने हसू लागले. हा व्हिडिओ ग्लॅमरन संघाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.
😂😂😂 @Cooky_24!
His teammates enjoyed this one from the skipper!#GoGlam pic.twitter.com/fRGg7si1md
— Glamorgan Cricket 🏏 (@GlamCricket) May 21, 2021
या सामन्यात केंट संघाने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद ३०७ धावा केल्या होत्या. तर ग्लॅमरगन संघाने ३ बाद ६४ धावांपर्यंत मजल मारली आहे. केंट संघ या सामन्यात २४३ धावांनी पुढे आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
जमतंय की! ‘मिसेस बुमराह’च्या सुपरकूल डान्सने जिंकली चाहत्यांची मने, बघा भारी व्हिडिओ
विराटच्या शतकाची प्रतिक्षा कधी संपणार? पाकिस्तानी दिग्गज म्हणतो, “कोहलीसारखा फलंदाज…”