मंबई किनारी पाहिला डाॅल्फिन मासा, रोहित केले त्याचे खास स्वागत

भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार रोहित शर्माने आज एक खास ट्विट करत आनंद व्यक्त केला आहे. मुंबईला अरबी समुद्राच्या किनारी मजा करत असलेले डाॅल्फिनवर त्याने हा ट्विट केला आहे.

भारतात सध्या सगळीकडे शांतता आहे. नागरिक रस्त्यावर नाहीत. तसेच वाहनेही रस्त्यावर नाहीत. मुंबईशहरात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कर्फ्यु लावण्यात आला आहे. यामुळे कुणीही रस्त्यावर नाही. याचाच परिणाम म्हणून की काय मरिन ड्राईव्हजवळ समुद्रकिनाऱ्यावर डाॅल्फिन पाहिल्याचे वृत्त आहे.

यावर भारतीय संघाचा उपकर्णधार रोहितने खास ट्विट केला आहे. “मुंबई समुद्रकिनारी डाॅल्फिन मासा एका छायाचित्रात पहायला मिळाला. याचा खूप आनंद आहे. यावरुन कळते की आपण सर्वजणांनी काही गोष्टी कटाक्षाने पाळल्या तर खूप मोठा फरक साधला जाऊ शकतो. व निसर्ग व माणसात समतोल राखला जाऊ शकतो.” असे ट्विट रोहितने यावर केले आहे.

विशेष म्हणजे अभिनेत्री जुही चावलानेही याबद्दल ट्विट केला आहे.

रोहित भारतीय संघातील एक महत्त्वाचा खेळाडू असून सध्या तो सोशल मिडीयावर नेहमी व्यक्त होतो. विषय मुंबईचा असेल तर तो त्यावर आपले मत व्यक्त करतोच.

रोहितने भारताकडून २२४ वनडे, १०८ टी२० व ३२ कसोटी सामने खेळले आहेत. तसेच मुंबई इंडियन्स संघाचा तो कर्णधारही आहे. आयपीएलमध्ये त्याने १८८ सामन्यांत ४८९८ धावा केल्या आहेत.

ट्रेंडिंग घडामोडी-

घर फिरले की घराचे वासेही फिरतात, डेल स्टेनवर आली सर्वात मोठी वाईट वेळ

-तर आयपीएलचे सर्व सामने महाराष्ट्रातील या ४ स्टेडियमवर होणार

-बीसीसीआयचं अध्यक्षपद कायम रहावं म्हणून गांगुलीसाठी या व्यक्तीने लावली फिल्डींग

-त्या १४ धावा अशा होत्या की सचिनने लगेच उंचावली होती बॅट

You might also like