---Advertisement---

इंग्लंडच्या क्रिकेट वर्तुळात कोरोनाचा हाहाकार; ‘या’ संघाचा सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने सामनाही रद्द

On: मंगळवार, जुलै 13, 2021 4:15 AM
---Advertisement---

इंग्लंडच्या क्रिकेट वर्तुळात सध्या कोरोना व्हायरलने हाहाकार माजवला आहे. काही दिवसांपूर्वीच इंग्लंडच्या वनडे संघातील ७ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर काऊंटी क्रिकेटमध्येही आता कोरोना पॉझिटिव्ह खेळाडूंची प्रकरणे समोर येत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार डर्बीशायर संघाचा सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. ज्यामुळे आयोजकांनी डर्बीशायर विरुद्ध एसेक्स संघात होणारा सामना रद्द केला आहे.

काऊंटी क्रिकेटमधील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक फलंदाज पीटर हँड्सकॉम्ब या स्पर्धेत खेळत असताना कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्याला यामुळे २ सामन्यांना मुकावे लागणार आहे. तसेच केंट संघाचाही एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांना संपूर्ण संघ बदलावा लागला होता.

पण, सध्या डर्बीशायरचा कोणता सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आहे, याबाबत माहिती देण्यात आलेली नसली तरी, तो सध्या आयसोलेशनमध्ये असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याच्यासह त्याच्या संघसहकाऱ्यांनाही आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यानंतर  सामन्यासाठी मैदानात उतरण्यासाठी पुरेसे खेळाडू नसल्याने पंचांनी त्यांचा सामनाही रद्द केला आहे.

या प्रकरणाबाबत डर्बीशायरचे सीईओ रियान डुकेट यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की ‘सामना रद्द होणे निराशाजनक आहे, पण खेळाडू, स्टाफ आणि चाहत्यांची सुरक्षा जास्त महत्त्वाची आहे.’ तसेच त्यांनी सांगितले की सामन्यासाठी ज्या चाहत्यांनी तिकीटं खरेदी केली होती, त्याचे पैसे त्यांना परत मिळतील.

इंग्लंड संघातील ७ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह
इंग्लंड विरुद्ध श्रीलंका संघात नुकतीच मर्यादीत षटकांच्या मालिका पार पडल्या. या मालिका ४ जुलै रोजी संपल्यानंतर ६ जुलै रोजी इंग्लंडच्या संघातील ७ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यात ३ खेळाडूंचाही समावेश आहे. त्यामुळे इंग्लंडचा संपूर्ण मुख्य संघच क्वारंटाईन झाला आहे.

तसेच याच कारणामुळे ८ जुलैपासून पाकिस्तानविरुद्ध सुरु झालेल्या वनडे मालिकेआधी इंग्लंडला एका रात्रीत संपूर्ण संघ नव्याने तयार करावा लागला. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने नव्या संघाची घोषणा करताना अष्टपैलू बेन स्टोक्सकडे नेतृत्वाची धूरा सोपवली. स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंडच्या या नव्या संघाने वनडे मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यांत विजय मिळवला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

सानिया मिर्झाच्या आधी हैदराबादमधील मुलीबरोबर शोएब मलिकने केला होता निकाह? 

श्रीलंका दौऱ्याच पंड्या बंधू आणि चाहर बंधू एकत्र खेळल्यास तब्बल ८७ वर्षांनी होणार ‘असा’ कारनामा

धोनी गुपचूप चण्याच्या गाड्यावर ठेवून आला तब्बल ३५ हजार रुपये, ‘हे’ होते कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---