मुंबई । कॅरेबियन प्रीमियर लीग (सीपीएल) 2020 च्या हंगामातील विजेता मिळाला आहे. सीपीएलच्या अंतिम सामन्यात शाहरुख खानच्या मालकीच्या ट्रिनबागो नाइट रायडर्सने सेंट लुसिया झुक्सचा 8 गडी राखून पराभव केला. सेंट लुसियाने विजेतेपदाच्या सामन्यात 154 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात त्रिनिबागोने 18.1 षटकांत 2 बाद 157 धावा केल्या. अशाप्रकारे ट्रिनबागोच्या संघाने चौथ्यांदा सीपीएलचे विजेतेपद मिळविले. ब्रायन लारा स्टेडियमवर हा सामना खेळला गेला.
डॅरेन ब्राव्होने विजयी चौकार ठोकला
19व्या षटकातील केसरिक विल्यम्सनच्या पहिल्या चेंडूवर डॅरेन ब्राव्होने चौकार मारत संघाला विजेतेपद मिळवून दिले. त्याने 47 चेंडूत 2 चौकार व 6 षटकारांच्या मदतीने नाबाद 58 धावा केल्या.
लेंडल सिमन्सचे अर्धशतक
दरम्यान, लेन्डल सिमन्सने 12 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर दोन धावा घेऊन 31 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.
अशाप्रकारे 100 धावा पूर्ण झाल्या
दोन विकेट पडल्यानंतर लेंडल सिमन्स आणि डॅरेन ब्राव्हो यांनी सामना हाती घेतला आणि आरामात संघाला 100 धावांवर नेले. संघाची 50 धावा 9 षटकांत पूर्ण झाली, तर 13.5 षटकांत 100 धावा पूर्ण झाल्या.
त्रिनिबागोला संघाला बसले सुरुवातीचे झटके
टीएनआर संघाने 155 धावांचा पाठलाग सुरू केला. पण त्यांची सुरुवात खराब झाली. संघाची धावसंख्या 13 असताना सलामीवीर टी. वेबस्टर (5) बाद झाला. यानंतर टिम सेफर्ट (4) देखील स्वस्तात बाद झाला. तेव्हा संघाची धावसंख्या 2 बाद 19 अशी होती.
सेंट लुसियाने केल्या 155 धावा
चांगली सुरुवात झाल्यानंतर स्लॉग ओव्हर्समध्ये विकेट पडल्यामुळे सेंट लुसियाचा संघ 19.1 षटकांत 154 धावांवर गडगडला. यात आंद्रे फ्लेचरने 39, मार्क डोईलने 29, रोस्टन चेसने 22 आणि नजीबुल्लाने 24 धावा केल्या. त्रिनिबागोकडून कर्णधार पोलार्डने सर्वाधिक 4 तर फवाद अहमद आणि अली खानने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
धडाधड पडले विकेट
संघाच्या 100 धावा पूर्ण झाल्या की रोस्टन चेस (22), मोहम्मद नबी (2), डॅरेन सॅमी (8), जे. ग्लेन (9) आणि नजीबुल्ला जदारान (24) यांच्या झटपट विकेट्स गेल्या.
शाहरुख विरुद्ध प्रीती झिंटा
या लीगमध्ये बॉलीवूड कनेक्शन देखील आहे. वास्तविक, ट्रिनबागो नाइट रायडर्सची मालकी शाहरुख खान आणि सेंट लुसिया झुक्सचे सह-मालक प्रिती झिंटा यांच्याकडे आहे. या दोघांचाही आयपीएलमध्ये एक संघ आहे. शाहरुखकडे केकेआर आहे तर प्रीतीकडे किंग्ज इलेव्हन पंजाबची मालकी आहे.
सलग 10 विजय
त्रिनबागोने उपांत्य सामन्याआधी लीगचे सर्व 10 सामने जिंकले होते. उपांत्य फेरीत ट्रिनबागोने, जमैका तलवाह संघाला सात बाद 107 या धावसंख्येवर रोखले. आणि त्यानंतर पाच षटके अाणि नऊ गडी राखून विजय मिळविला.
दुसर्या उपांत्य सामन्यात सेंट लुसिया झुक्सने गयाना अमेझॉन वॉरियर्सला 13.4 षटकांत 55 धावांवर बाद केले. सेंट लुसियाने एकही विकेट न गमावता अवघ्या 3.3 षटकांत हे अाव्हान पार केले अाणि दहा गडी राखून विजय मिळविला.
CPL चे विनर
2013: जमैका तैलवाह
2014: बारबाडोस ट्रिडेंट्स
2015: त्रिनिदाद ऐंड टोबैगो
2016: जमैका तैलवाह
2017: त्रिनिबागो नाइट राइडर्स
2018: त्रिनिबागो नाइट राइडर्स
2019: बारबाडोस ट्रिडेंट्स
2020: त्रिनिबागो नाइट राइडर्स