सध्याच्या भारतीय संघात आर अश्विन हा एकमेव अनुभवी फिरकी गोलंदाज आहे.
मात्र गेल्या एक वर्षापासून कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहलच्या प्रभावी कामगिरीमुळे अश्विनला टी-20 आणि एकदिवसीय संघातील स्थान गमवावे लागले आहे. तसेच अश्विनचे कसोटी संघातील स्थानही धोक्यात आले आहे.
असे असले तरी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने अश्विनची पाठराखन केली आहे.
“कसोटी क्रिकेटमध्ये 300 बळी मिळवणाऱ्या गोलंदाजाला अशाप्रकारे संघातून बाहेर जाताना मी पाहू शकत नाही. अश्विनकडे सर्वोत्तम कामगिरी करण्याची क्षमता आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 300 पेक्षा जास्त बळी मिळवत त्याने हे सिद्ध केले आहे. या शब्दात गांगुलीने आर अश्विनची पाठराखण केली.
“अश्विनला जाणीव आहे की, कुलदीप मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत कसोटी संघात स्थान निर्माण करत आहे. त्यामुळे अश्विन स्वत:ला नक्की नव्या रुपात समोर आणेल. त्याला इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत मिळालेल्या संधीचा तो नक्की फायदा उठवेल.” असे सौरव गांगुली म्हणाला.
1 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेतील अंतिम 11 खेळाडूंच्या संघात अश्विनचे स्थान पक्के नाही. मात्र संधी मिळाल्यास त्याला भारतीय संघासाठी त्याचा अनुभव पणाला लावावा लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–बापरे! स्पॉट फिक्सिंग प्रकरणात ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या खेळाडूचे नाव
–मला आॅलिंपिंक गोल्ड मेडल जिंकायला आवडलं असतं – राहुल द्रविड