सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यात (Australia Tour of South Africa) आंतरराष्ट्रीय टी20 आणि वनडे मालिका खेळण्यात व्यस्त आहे. आज (26 फेब्रुवारी) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी20 मालिकेतील शेवटच्या आणि निर्णायक सामन्यापूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे.
13 मार्चपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड (Australia vs New Zealand) संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेला (3 Matches of ODI Series) सुरुवात होणार आहे. या वनडे मालिकेचे आयोजन ऑस्ट्रेलियाने केले आहे. या मालिकेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या 14 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या वनडे संघात वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसनला (Jhye Richardson) संधी देण्यात आली नाही. परंतु तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळणार असल्याची माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिली आहे.
याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या 14 जणांच्या या संघात फलंदाज डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथला (Steve Smith) कायम केले आहे. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज जॉश हेजलवुडलाही (Josh Hazlewood) संघात सामील करण्यात आले आहे.
13 मार्चला सिडनी क्रिकेट ग्राऊंड (Sydney Cricket Ground, Sydney) येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड संघात पहिला वनडे सामना होणार आहे. तर दुसरा वनडे सामना याच मैदानावर 15 मार्चला होणार आहे. या सामन्यातील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना शुक्रवारी 20 मार्चला बेलेराईव्ह ओव्हल, हॉबर्ट (Bellerive Oval, Hobart) येथे होणार आहे.
या वनडे मालिकेनंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड संघात 3 सामन्यांची आंतरराष्ट्रीय टी20 मालिका खेळण्यात येणार आहे.
न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेसाठी असा असेल ऑस्ट्रेलिया संघ-
ऍरॉन फिंच (कर्णधार), ऍश्टन एगर, ऍलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिंस (उपकर्णधार), जॉश हेजलवुड, मार्नस लॅब्यूशाने, मिचेल मार्श, केन रिचर्डसन, डार्सी शॉर्ट, स्टिव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, ऍडम झंपा.
आयपीएलमध्ये टाॅम करन या दोन भारतीय खेळाडूंची विकेट घेणारचं
वाचा- ????https://t.co/9rg0SpAFtX????#म #मराठी #Cricket #IPL2020 @tomcurrans— Maha Sports (@Maha_Sports) February 25, 2020
अशी कामगिरी करणे भल्याभल्यांना जमत नाही, पण १६ वर्षीय शेफालीने ती करुन दाखवली!
वाचा- ????https://t.co/KIQ2gynuKf????#म #मराठी #Cricket @TheShafaliVerma— Maha Sports (@Maha_Sports) February 25, 2020