fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

सचिन, गांगुली, द्रविडला बाद करणार्‍या खावी लागली होती एकवेळ जेलची हवा; आज झालाय योग गुरु!

मुंबई | झिम्बाब्वे क्रिकेट संघाने जागतिक क्रिकेटला नव्वदच्या दशकात अँडी फ्लॉवर, ग्लॅंड फ्लॉवर, हिथ स्ट्रीक, हेंन्री ओलोंगा, स्टुअर्ट कॅम्बेल यासारखे एकापेक्षा एक दर्जेदार खेळाडू दिले. या संघाने कधी आयसीसीची मोठी ट्रॉफी जिंकली नाही पण विरोधी संघाला चांगले झुंजवायचे.

1999 नंतर रॉबर्ट मुगाबे यांच्या कोटा सिस्टीमला विरोध सुरू झाला. त्यानंतर अनेक क्रिकेटपटूंनी क्रिकेट खेळणं सोडून दिलं. कोटा सिस्टीमला विरोध केला म्हणून काही खेळाडूंना जेलची हवा देखील खावा लागली. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रायन स्ट्राँग आहे.

ब्रायन स्ट्राँग आपल्या धारदार गोलंदाजीने सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली सारख्या दिग्गज फलंदाजाला बाद केले होते. अशा गुणवंत खेळाडूला झिम्बाब्बे क्रिकेटमधल्या राजकारणाला बळी पडावे लागले. जेलमधून बाहेर पडल्यावर त्याने क्रिकेटमधून निवृत्ती निवृत्ती घेतली.

क्रिकेट सोडल्याने त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आणि तो डिप्रेशनमध्ये गेला. परिणामी या खेळाडूने आत्महत्या करण्याचा प्रयत्न देखील केला. स्वतःला सावरण्यासाठी त्याने योगाचा आधार घेतला आणि आपले आयुष्य बदलून टाकले.

योगाचे प्रशिक्षण घेण्यासाठी तो भारतात आला. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तो जगभर हिंडून योगाचं ज्ञान देऊ लागला. योगा हेच जगण्याचं साधन आहे असे जगाला सांगू लागला. एक वेगवान गोलंदाज म्हणून करिअरची सुरुवात करणारा हा खेळाडू आता जगाला योगाचे धडे देतोय. ब्रायन स्ट्राँगने आज योग गुरु म्हणून प्रसिद्ध आहे. यासोबत तो मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षणही देतो. ब्रांयन म्हणतो, क्रिकेट पण एका योगा सारखे आहे. ते आपल्याला जगायला शिकवते. क्रिकेट खेळते वेळी आपण सर्व काही विसरून जातो.

आपल्या छोट्याश्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झिम्बाब्वे संघाकडून क्रिकेट खेळताना 26 कसोटी सामन्यात 56 बळी घेतले तर 49 एकदिवसीय सामन्यात 46 बळी टिपण्यात यशस्वी झाला. प्रथम श्रेणी कारकिर्दीमध्ये स्ट्रॉगच्या नावावर 252 बळींची नोंद आहे. ब्रायनचा भाऊ पॉल आणि वडील रोनाल्ड स्ट्राँग हे झिम्बाब्वे संघाकडून क्रिकेट खेळले आहेत आणि ते पंचांची भूमिका देखील निभावले आहेत. इंजमाम उल हक आणि आमीर सोहेल सारख्या फलंदाजांना बाद करुन ड्रेसिंग रुमचा रस्ता दाखवणाऱ्या या क्रिकेटपटूची कारकिर्द अखेर 2001 मध्ये संपली.

You might also like