अँटिग्वा। कर्णधार यश धूलच्या नेतृत्त्वातील युवा भारतीय संघाने शनिवारी इतिहास घडवला. भारताच्या १९ वर्षांखालील संघाने १९ वर्षांखालील विश्वषचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंड संघाला पराभूत विक्रमी पाचवे विजेतेपद पटकावले. आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषक २०२२ स्पर्धेतील भारताच्या विजयाबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
आजी-माजी क्रिकेटपटूंकडून युवा संघाचे कौतुक
शनिवारी भारतीय संघाने पाचव्यांदा १९ वर्षांखालील विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरले. यानंतर भारताच्या अनेक आजी-माजी खेळाडूंनी युवा संघावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. भारताचा माजी कर्णधार आणि सध्याचा बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने ट्वीट करत म्हणले आहे की, ‘१९ वर्षांखालील भारतीय संघाचे आणि सपोर्ट स्टाफ व निवडकत्यांचे विश्वचषक जिंकल्याबद्दल अभिनंदन. कौतुक म्हणून खेळाडूंसाठी ४० लाखांची बक्षीस रक्कम देण्यात येणार आहे. पण त्यांचे कष्ट हे या मुल्याच्या पलिकडील आहेत. शानदार.’
बीसीसीआयकडून १९ वर्षांखालील विश्वचषक २०२२ विजेत्या भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूला ४० लाख रुपये बक्षीस रक्कम मिळणार आहे, तर भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमधील प्रत्येक सदस्यांला २५ लाख रुपये बक्षीस रक्कम मिळणार आहे.
Congratulations to the under 19 team and the support staff and the selectors for winning the world cup in such a magnificent way ..The cash prize announced by us of 40 lakhs is a small token of appreciation but their efforts are beyond value .. magnificent stuff..@bcci
— Sourav Ganguly (@SGanguly99) February 5, 2022
याशिवाय युवराज सिंगने ट्वीट केले आहे की, ‘१९ वर्षांखालील विश्वचषक जिंकल्याबद्दल भारतीय संघाचे आणि संपूर्ण देशाचे अभिनंदन. रवी कुमार आणि राज बावाने शानदार गोलंदाजी केली. भारतीय क्रिकेटचे भविष्य उज्ज्वल दिसत आहे. खूप चांगले खेळले, खूप अभिमान वाटत आहे.’
Congratulations to the #BoysinBlue & the entire nation for winning the #U19CWC! Amazing spells by Ravi Kumar & Raj Bawa 👏🏻 👊🏻 The future of Indian cricket looks bright 🇮🇳 Well played boys. Super proud! @BCCI
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) February 5, 2022
याबरोबरच भारताचा फिरकीपटू आर अश्विनने ट्वीट केले की, ‘विश्वचषक जिंकल्याबद्दल संपूर्वी भारतीय संघाचे कौतुक.’
Congratulations to the entire #IndiaU19 contingent on winning the World Cup. 👏👏👏
— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) February 6, 2022
अजिंक्य रहाणेने देखील युवा भारतीय संघाचे कौतुक करत ट्वीट केले की, ‘१९ वर्षांखालील भारतीय संघाचे विश्वचषक घरी आणण्याबद्दल अभिनंदन. पुढील प्रवासासाठी शुभेच्छा.’
Congratulations to the #IndiaU19 team for bringing the trophy home! Wishing you all the best for an exciting journey ahead 👏🏻
— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) February 6, 2022
याशिवाय देखील अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी १९ वर्षांखालील भारतीय संघाचे कौतुक केले आहे.
Congratulations india U-19 Worldcup champions 🎉🎉🎉🎉 pic.twitter.com/wjsGUTunei
— 𝕸𝖔𝖍𝖆𝖒𝖒𝖆𝖉 𝖘𝖍𝖆𝖒𝖎 (@MdShami11) February 5, 2022
Congratulations on winning the U19 World Cup 🇮🇳🇮🇳 ! Well done and thoroughly deserved 👏🏼👏🏼 #U19WorldCup2022 #IndiaU19 pic.twitter.com/RJWAN14pe6
— Mayank Agarwal (@mayankcricket) February 5, 2022
A 6️⃣ to seal the deal!!
So so happy for all of you… you all have made us proud! 🏆🇮🇳
Many congratulations #TeamIndia.#U19CWC pic.twitter.com/zlCjWp9nM9— DK (@DineshKarthik) February 6, 2022
Congratulations to our u-19 team on a remarkable feat! 🇮🇳 pic.twitter.com/Is9KZAMXTY
— Shikhar Dhawan (@SDhawan25) February 5, 2022
Well deserved 👏 What an effort! Congratulations boys 🏆🇮🇳
— Shreyas Iyer (@ShreyasIyer15) February 5, 2022
Congratulations to the entire #IndiaU19 team on lifting the world cup! Future of Indian cricket looks to be exciting!
— Kris Srikkanth (@KrisSrikkanth) February 6, 2022
Champions 🏆
Congratulations to the 🇮🇳 U-19 team on a terrific performance. Brilliant with the bat and ball. The whole nation is proud of you. Cheers. pic.twitter.com/3DXKIbbwxO— Ravindrasinh jadeja (@imjadeja) February 6, 2022
Well deserved champions. 👏👏
Each one of them stood up and contributed for the team. A big congratulations to everyone involved. Enjoy the moment. 🇮🇳🏆 pic.twitter.com/6CByhWnZpH— Rishabh Pant (@RishabhPant17) February 6, 2022
Jalwa hai hamaara yahaan.
Many congratulations @BCCI on becoming champions for the 5th time.
Fantastic contributions from everyone and a deserved title. Enjoy the moment boys #U19CWC pic.twitter.com/E0zqirfIPA— Virender Sehwag (@virendersehwag) February 6, 2022
Nation of domination! 🇮🇳 #IndiaU19
— Gautam Gambhir (Modi Ka Parivar) (@GautamGambhir) February 6, 2022
भारताचे विक्रमी विजेतेपद
भारतीय संघाचे हे १९ वर्षांखालील विश्वचषकातील पाचवे विजेतेपद होते. यापूर्वी भारतीय संघाने २०००, २००८, २०१२ आणि २०१८ साली १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकला आहे. त्यामुळे भारत या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ ठरला आहे.
असा झाला अंतिम सामना
शनिवारी पार पडलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ४४.५ षटकात सर्वबाद १८९ धावा केल्या होत्या. या सामन्यात इंग्लंडने सुरुवातीला चांगलाच संघर्ष केला होता. इंग्लंडने ९१ धावांवर ७ विकेट्स गमावल्या होत्या. पण जेम्स ऱ्यू याने एकाकी झुंज देताना ९५ धावांची खेळी केली. तसेच तळात फलंदाजी करताना जेम्स सेल्सने नाबाद ३४ धावांचे महत्त्वाचे योगदान दिले. त्यामुळे इंग्लंड संघ १८९ धावांपर्यंत पोहचू शकला. भारताकडून रवी कुमारने ४ आणि राज बावाने ५ विकेट्स घेतल्या.
यानंतर १९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाचीही सुरुवात संघर्षपूर्ण राहिली. मात्र, उपकर्णधार शेख राशिद आणि निशांत संधू यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने ४८ व्या षटकात ६ विकेट्स गमावून १९५ धावा करत विजय मिळवला आणि विजेतेपदावर आपले नाव कोरले.
भारताकडून राशिदने ५० आणि निशांतने ५० धावा केल्या. तसेच राज बावाने ३५ धावांची खेळी केली. याशिवाय ४८ व्या षटकात दोन सलग विजयी षटकारांसह दिनेश बाणाने नाबाद १३ धावा केल्या. इंग्लंडकडून जोशुआ बायडेन, जेम्स सेल्स आणि थॉमस ऍस्पिनवॉल यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
VIDEO: रिव्ह्यू घेण्यातही कॅप्टन रोहित हिट! चलाखीने दाखवला ब्रावोला तंबूचा रस्ता
‘लेगस्पिन ग्रँडमास्टर’ चहलने घातली नव्या विक्रमाला गवसणी