fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

क्रिकेट खेळायचंय तर आयसीसीच्या या ३ कठीण नियमांच करावं लागणार पालन

दुबई | आयसीसीने कोरोना व्हायरच्या नंतर सुरू होणाऱ्या क्रिकेट मालिकेपूर्वी खेळाडू आणि संघासाठी नवे नियम(दिशा निर्देश) जारी केले आहेत. आयसीसीच्या या नव्या नियमांना फॉलो करणे खेळाडूंना काही वेळासाठी अवघड जाणार आहे. त्यामुळे खेळाडूंना कोरोना व्हायरसच्या नंतर सुरू होणाऱ्या क्रिकेट पूर्वी आपल्या सवयींमध्ये बदल करावा लागणार आहे.

नव्या नियमानुसार खेळाडूंना सराव सत्रात स्वच्छतेसाठी (टॉयलेटला) जाता येणार नाही आणि त्यासोबतच मैदानावर उभे राहून पंचगिरी करणाऱ्या पंचांच्या हाती सनग्लास आणि टोपीची जबाबदारी सोपवता येणार नाही.

आयसीसी म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने दिलेल्या दिशा निर्देशांमध्ये खेळाडूंच्या वस्तू कुणाकडे सोपवायच्या यांची माहिती दिली नाही. तसेच खेळाडूंना त्यांची टोपी आणि सन क्लासेस हे मैदानावर ठेवता येणार नाही, जर का ठेवल्यास त्याला पेनल्टी दिले जाऊ शकते. आयसीसीला वाटते की, खेळाडूंनी सामन्यापूर्वी आणि नंतर ड्रेसिंग रूममध्ये सर्वात कमी वेळ घालवावे.

आयसीसीने यापूर्वी चेंडूला लाळ लावण्यास प्रतिबंध घातला आहे. आता खेळाडूंनी चेंडूला स्पर्श केल्यानंतर तो हात नाक, तोंड आणि डोळ्याला न लावण्याचा सल्ला दिला आहे. तसेच चेंडूशी संपर्क आल्यानंतर लगेच हात स्वच्छ करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सराव सत्रात खेळाडूंना शौचालयाचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली नाही.

कोरोना वायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आयसीसीने शुक्रवारी या नव्या दिशादर्शक नियमांची माहिती दिली. तसेच तांत्रिक समितीने क्रिकेट मालिका सुरू होण्यापूर्वी खेळाडूंना चौदा दिवस वेगळे ठेवण्याची शिफारस करण्यात आली होती. कोरोना व्हायरसमुळे सध्या जगात कोणतीच क्रिकेट मालिका खेळविण्यात येत नसून सर्वच क्रिकेट मालिका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहेत. तसेच ऑस्ट्रेलिया येथे होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्व करंडकावरही कोरोनाचे काळे सावट गडद होताना दिसून येत आहे.

You might also like