T20 World Cup 2024: उन्मुक्त चंद याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 19 वर्षांखालील विश्वचषक 2012 जिंकला होता. पण आता हा खेळाडू अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय संघाचा भाग बनला आहे. तुम्हाला माहिती आहे का की, जसप्रीत बुमराह व्यतिरिक्त संजू सॅमसन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, सूर्यकुमार यादव सारखे खेळाडू उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली खेळले आहेत.
आगामी टी-20 विश्वचषकात भारत आणि अमेरिका हे संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्यात उन्मुक्त चंद भारताविरुद्ध अमेरिकेकडून खेळताना दिसणार आहे. (फोटो क्रेडिट: सोशल मीडिया)
उन्मुक्त चंद व्यतिरिक्त हरमीत सिंग आणि स्मित पटेल हे 19 वर्षांखालील विश्वविजेत्या संघाचा भाग होते, पण आता हे तीन क्रिकेटपटू भारताविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. (फोटो क्रेडिट: सोशल मीडिया)
हरमीत सिंग 2012 च्या 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकणाऱ्याभारतीय संघाचा सदस्य होता. हरमीत सिंग अमेरिकेकडून खेळण्यासाठी पात्र ठरला आहे. (फोटो क्रेडिट: सोशल मीडिया)
याशिवाय स्मित पटेलचे नावही या यादीत सामील आहे. उन्मुक्त चंद आणि हरमीत सिंग यांच्याशिवाय स्मित पटेलही अमेरिकेकडून खेळण्यासाठी पात्र ठरला आहे. हे तिन्ही खेळाडू आगामी टी-20 विश्वचषकात भारताविरुद्ध खेळताना दिसण्याची दाट शक्यता आहे. (Shiledar who made India the world champion, will play for Team India this country is ready to play T20 World Cup)
हेही वाचा
ऑस्ट्रेलियन संघात मोठा बदल; मिचेल मार्श कर्णधार, स्टार अष्टपैलू खेळाडूचंही संघात पुनरागमन
इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसन रामभक्तीत तल्लीन! हिंदीत पोस्ट लिहून सर्वांना केले चकित