क्रिकेट हा खेळ दिसताना साधा आणि सरळ दिसत असला, तरी या खेळात अनेक नियम आणि कायदे आहेत. हे नियम मेरिलबोन क्रिकेट क्लब (एमसीसी) ही संस्था बनवते आणि वेळोवेळी नियमांमध्ये बदल देखील हीच संस्था करत असते. या संस्थेने बनवलेल्या नियमांना आयसीसीकडून मान्यता दिली जाते. आत्तापर्यंत क्रिकेटमध्ये सध्यातरी ४२ कायदे आहेत. या कायद्यांमध्येच सर्व नियमांचा उल्लेख असून त्यानुसारच सध्याचे क्रिकेट खेळले जाते.
दरम्यान, हे कायदे (Cricket Rules) केवळ फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण अशा केवळ ३ क्षेत्रात नाही, तर क्रिकेटच्या विविध परिस्थितींबद्दल, खेळपट्टीबद्दल देखील आहेत विशेष म्हणजे खेळपट्टीवर कव्हर केव्हा घातले जातात, याबद्दलही नियम आहेत. खेळपट्टीवरील कव्हरचा (Covering The Pitch) नियम हा एमसीसीच्या (MCC) १० व्या कायद्याच्या अंतर्गत आहे. या लेखातही आपण हे नियम जाणून घेऊ.
काय आहे खेळपट्टी झाकण्याचा नियमत
खेळपट्टी झाकण्याचा नियम हा १० व्या कायद्याअंतर्गत येतो. यात १०.१ नियमाअंतर्गत सामन्यापूर्वी कव्हर्सचा उपयोग मैदान प्रशासकांची जबाबदारी असते. यामध्ये गरज पडल्यास संपूर्ण मैदानाला झाकणे, देखील सामील आहे. असे असले तरी मैदान प्रशासकांना कर्णधारांना खेळपट्टीचे निरिक्षण करण्यासाठी योग्य सुविधा पुरवाव्या लागतात. तसेच पंचांना खेळपट्टी, क्रिज, स्टंप्स, मैदान यांसंबंधी आपली कर्तव्य पूर्ण करण्यासाठी सुविधा पुरवाव्या लागतात.
तसेच १० व्या कायद्यातील दुसऱ्या नियमांनुसार नाणेफेकीपूर्वी किंवा काही ठरवल्याशिवाय सामन्याच्या प्रत्येक रात्री आणि खराब हवामानात कोणत्याही वेळी पूर्ण खेळपट्टी आणि प्रत्येक बाजू मागे किमान ४ फूट म्हणजे १.२२ मीटर झाकले गेले पाहिजे. तसेच शक्य असेल, तिथे गोलंदाजांच्या रन-अपचे क्षेत्रही झाकले जावे.
क्रिकेटच्या १० व्या कायद्यातच कव्हर हटवण्याबद्दलचेही नियम सांगितले आहेत. त्यानुसार जर नाणेफेकीनंतर रात्रभर खेळपट्टी झाकण्यात आली असेल, तर प्रत्येक दिवसाच्या खेळ सुरू होण्याची संभावना दिसल्यानंतर जेवढे लवकर शक्य होईल, तेवढे लवकर कव्हर्स हटवण्यात यायला हवेत. तसेच जर खराब हवामानात दिवसा कव्हर्सचा वापर झाला, किंवा खराब हवामानामुळे रात्री लावलेले कव्हर्स काढण्यात आले नाहीत, तर अशावेळी परिस्थिती योग्य होताच ते कव्हर्स शक्य तितक्या लवकर हटवले जावेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
आरारा खतरनाक! मुंबईने अव्वल क्रमांकावरील गुजरातला हरवल्यावर सोशल मीडियावर मीम्सचा सुळसुळाट
IPL | अटीतटीच्या लढतीत मुंबईच सर्वांना वरचढ! ‘इतक्यांदा’ मिळवला ५ पेक्षा कमी धावांनी विजय
‘नशीब कधी ना कधी बदलणार होतेच’, मुंबईच्या दुसऱ्या विजयानंतर कर्णधार रोहित खुश