मुंबई । वयाच्या 19व्या वर्षी बांगलादेशकडून 2016मध्ये पदार्पण करताना मेहिदी हसन याने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात 19 गडी बाद करून दमदार पदार्पण केले होते. त्याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर बांगलादेशने ही कसोटी मालिका अनिर्णित ठेवण्यात यशस्वी ठरला.
बांगलादेशच्या या फिरकीपटूने आता भारताचा माजी फिरकीपटू रमेश पवार आदर्श गोलंदाज असल्याचे एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.
मेहिदी हसन खुलासा करताना म्हणाला, मी रमेश पोवार यांची गोलंदाजी ऍक्शन फॉलो करतो. त्यांच्यामुळेच माझ्या गोलंदाजीत सुधारणा झाली. सुरुवातीच्या काही दिवसांत मी माझ्या गोलंदाजी अॅक्शनमुळे अडचणीत होतो. त्यामुळे मला गोलंदाजी करताना मला लय सापडत नव्हती. टीव्हीवर भारताचा एक सामना मी पाहातो, तेव्हा रमेश पवार गोलंदाजी करण्यास आले. पोवार शरीराने धष्टपुष्ट असूनही त्याचे चेंडू जास्त फिरकी घेत . मला त्यांची गोलंदाजी अॅक्शन फार आवडली. त्यानंतर मी त्यांच्यासारखी गोलंदाजी करायला सुरुवात केली.
पुढे मी भारताचे माजी फिरकीपटू रमेश पोवार यांची गोलंदाजी अॅक्शन कॉपी करायला सुरुवात केली. अगदी कमी वयातच मी माझ्या गोलंदाजीला सरावाला सुरुवात केली. आज मी वेगवेगळ्या अॅक्शनमध्ये गोलंदाजी करतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना मला वाटायचे की मी पवार यांच्यासारखी गोलंदाजी करायचो पण माझी गोलंदाजी अॅक्शन पवार यांच्यापेक्षा वेगळी होती, असे हसन म्हणाला. बांगलादेशकडून खेळताना मेहंदी हसन यांनी 134 आंतरराष्ट्रीय बळी घेतले आहेत.
पाकिस्तानचा संघ हसनच्या फिरकी जाळ्यात
2018 आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात मेहंदी हसनने आपल्या फिरकी गोलंदाजीने विरोधी संघातल्या खेळाडूंची भंबेरी उडवली होती. त्याच्या दमदार प्रदर्शनामुळे बांगलादेशने पाकिस्तानला 37 धावांनी पराभूत केले. या सामन्यात हसनने 28 धावा देत 2 महत्त्वपूर्ण गडी बाद केले. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 239 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघाने 9 बाद 202 धावांपर्यंत मजल मारू शकला.