fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

अखेर मोठ्या संकटात ‘त्या’ असलेल्या मित्राच्या मदतीला धावुन आले रहाणे- जाफर

मुंबई |  मुंबईमधील स्थानिक क्रिकेटपटू अस्लम शेख हा गेल्या बऱ्याच दिवसांपासून आजारपणामुळे त्रस्त आहेत. त्याची सध्याची परिस्थिती नाजूक असल्याचे कळताच त्याचे सहकारी मित्र मदतीसाठी धावून आले आहेत.  यात मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील, माजी क्रिकेटपटू वसीम जाफर आणि भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य राहणे अस्लमच्या आजारपणात मदतीसाठी पुढे आले आहेत.

मुंबईत क्लब क्रिकेट खेळून आपला उदरनिर्वाह करणारा हा वेगवान गोलंदाज गेल्या तीन वर्षांपासून अंथरुणात खिळून आहे. मागील आठवड्यापासून त्याची प्रकृती अधिक नाजूक झाली आहे. अस्लमच्या या आजारपणात त्याला मदत करण्यासाठी अनेक क्रिकेटपटूंनी आर्थिक मदत दिली आहे. अस्लमला उपचार करण्यासाठी पाच ते सात लाख रुपयांची आर्थिक रक्कम काही क्रिकेटपटूंनी जमा करून त्याला दिली आहे. मदत देणाऱ्या खेळाडूंमध्ये वसिम जाफर आणि अजिंक्य राहणेचाही समावेश आहे.

माजी क्रिकेटपटू वसीम जाफर यावर बोलताना म्हणाला की, एका क्रिकेटपटूंच्या मदतीसाठी अनेक जण पुढे आलेत. ही चांगली गोष्ट आहे. हीच या क्रिकेटपटूची कमाई आहे. अस्लमने हिम्मत न हारता आजारपणाशी लढा द्यावा. लोक त्याचा खूप आदर करतात.

You might also like