भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने त्याच्या कामगिरीने गेल्या सात वर्षात क्रिकेट विश्वावर आपली छाप सोडली आहे.
त्याच्या फलंदाजीच्या जीवावर विराटने भारताला अनेकवेळा एकहाती विजय मिळवून दिले आहेत.
विराटने त्याच्या दमदार फलंदाजी बरोबर जगातील धावांचा पाठलाग करतानाचा जगातील सर्वात उत्कृष्ट फलंदाज म्हणून नाव कमावले आहे.
विराट आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिननंतर सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे.
त्याने 208 एकदिवसीय सामन्यात 35 शतके केली आहेत. विशेष म्हणजे या 35 शतकांपैकी धावांचा पाठलाग करताना विराटने 21 शतके केली आहेत. त्यात 19 वेळा भारतीय संघाने विजय मिळवला आहे.
विराटच्या याच कामगिरीचा आधार घेत दक्षिण अफ्रिकेचा स्फोटक फलंदाज हर्षल गिब्सने मोठं वक्तव्य केले आहे.
गिब्सने त्याचे मत ट्वीटच्या माध्यंमातून व्यक्त केले.
https://twitter.com/hershybru/status/1009117569142358016
19 जूनला झालेल्या इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने पहिल्यांदा फलंदाजी करत विश्वविक्रमी 481 धावा उभ्या केल्या.
ही धावसंख्या पाहुन ऑस्ट्रेलियनच नव्हे तर जगभरातील भल्या भल्या फलंदाजांच्या तोंडचे पाणी पळाले असेल.
पण हर्षल गिब्सला या आव्हानाचा विराट पाठलाग करू शकला असं वाटतेय. तसेच गिब्सला विराटने या धावसंख्येचा पाठलाग कसा केला असता याची उत्सुकता लागली होती.
महत्वाच्या बातम्या-
-रोहीत शर्माच्या यो-यो टेस्टबद्दलची ही आहे दिवसातील सर्वात मोठी बातमीमाजी भारतीय
-कबड्डीपटूचे स्वप्न उतरले सत्यात!