---Advertisement---

टीम इंडियातील पुनरागमन लांबलं! दुलीप ट्रॉफीत ऋतुराज गंभीर जखमी

---Advertisement---

दुलीप ट्रॉफी 2024 ची दुसरी फेरीला आज म्हणजेच 12 सप्टेंबरपासून सुरूवात झाली आहे. ज्यामध्ये भारत ‘क’ आणि भारत ‘ब’ चे आव्हान आहे. भारत ‘क’ चा कर्णधार ऋतुराज गायकवाड असून त्याच्या नेतृत्वाखाली संघाने विजयाने सुरुवात केली. मात्र दुसऱ्या सामन्यात संघाला सुरुवातीलाच मोठा फटका बसला आणि डावाच्या सुरुवातीलाच ऋतुराज गायकवाड दुखापतग्रस्त झाल्याने रिटायर्ड हर्ट झाला. त्याने आपल्या डावाची सुरुवात चौकाराने केली पण दुसऱ्या चेंडूनंतर तो मैदानाबाहेर गेला आणि त्याच्या जागी रजत पाटीदार फलंदाजीला आला.

दुलीप ट्रॉफीच्या चौथ्या सामन्यात भारत ‘ब’ संघाचा कर्णधार अभिमन्यू ईश्वरनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात भारत ‘क’ संघ फलंदाजीला आला. ऋतुराज गायकवाड आणि साई सुदर्शन ही जोडी भारत ‘क’ संघाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी आली. गायकवाडने मुकेश कुमारविरुद्ध पहिल्याच चेंडूवर चौकार मारला पण त्यानंतर तो निवृत्त झाला. मात्र, त्याच्या निवृत्तीचे नेमके कारण समजू शकलेले नाही कारण हा सामना प्रसारित केला जात नाहीये.

सोशल मीडियावरील काही वापरकर्ते असा दावा करत आहेत की धावताना ऋतुराजचा टाच वळला आणि यामुळे त्याला फक्त दोन चेंडू खेळल्यानंतर दुखापत झाली. मात्र त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळेपर्यंत ऋतुराजच्या अशा पद्धतीने बाहेर पडण्याचे कारण काय, हे सांगणे कठीण आहे.

स्पर्धेच्या पहिल्या फेरीत पहिल्या डावात ऋतुराज गायकवाडची बॅट चालली नाही आणि तो केवळ 5 धावा करून बाद झाला. मात्र, दुसऱ्या डावात त्याने चांगली फलंदाजी करत 46 धावा केल्या. अशा स्थितीत त्याच्या चांगल्या फॉर्ममुळे तो दुसऱ्या फेरीत मोठी धावसंख्या करेल अशी अपेक्षा होती पण त्याला सुरुवातीलाच दुखापत झाल्यामुळे निवृत्त व्हावे लागले.

ऋतुराज गायकवाडने सुरुवातीला संघातून बाहेर पडल्यानंतर साई सुदर्शन आणि रजत पाटीदार या जोडीने डाव चांगलाच पुढे नेला आणि या बातमीपर्यंत संघाने बिनबाद 81 धावा केल्या होत्या. याआधी भारत क ने आपल्या पहिल्या सामन्यात भारत ड चा 4 विकेट्सने पराभव केला होता.

हेही वाचा-

147 वर्षांचा इतिहास बदलण्यासाठी कोहली सज्ज, लवकरच तुटणार सचिन तेंडुलकरचा हा विक्रम
ट्रॅव्हिस हेडचा पंजाब किंग्जच्या कर्णधारावर हल्लाबोल, एका षटकात कुटल्या 30 धावा; पाहा व्हिडिओ
‘कप’च्या नावावर ‘बाउल’ दिले, मालिका जिंकूनही ऑस्ट्रेलियाचा अपमान? व्हिडिओ व्हायरल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---