मुंबई । कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे क्रिकेटच्या सर्व मालिका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्व क्रिकेटपटू आपल्या कुटुंबासाठी वेळ देत आहेत तर काही क्रिकेटपटूंनी आपला मोर्चा सोशल मीडियाकडे वाढवलेला आहे. यात अनेक गोष्टींचा खुलासा क्रिकेटपटू करताहेत. रोहित शर्माने संघातील वरिष्ठ खेळाडू युवराजसिंग आणि महेंद्रसिंग धोनीबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे.
भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित फेसबुक लाइव्हवर बोलताना म्हणाला की, जेव्हा तो पंचवीस- सव्वीस वर्षांचा होता, त्यावेळी संघात अनेक वरिष्ठ खेळाडू होते. महेंद्रसिंग धोनी आणि युवराज सिंग या खेळाडूंना धावायला आवडत नव्हते. त्यांना क्षेत्ररक्षणासाठी अशा ठिकाणी उभे केले जायचे ज्या ठिकाणी त्यांना जास्त धावावं लागत होते, असा धक्कादायक खुलासा रोहितने केला आहे.
2013 साली क्रिकेटर्स आणि बॉलिवूड सेलिब्रेटी यांच्यात एक फुटबॉलचा चॅरिटी सामना खेळण्यात आला होता. या सामन्याची आठवण करून देताना रोहित म्हणाला की, या सामन्यात महेंद्रसिंग धोनी आणि युवराज सिंग सारखे खेळाडू हा सामना खेळत होते. त्या वेळेस धावायला अावडत नसे.
लॉकडाऊन असल्यामुळे मुंबईतील सर्वच मैदाने बंद असल्याने रोहितला सराव करता येत नाही. त्यामुळे तो घरीच आहे. न्यूझीलंड दौऱ्यामध्ये त्याच्या मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे त्याला हा दौरा अर्ध्यावर सोडून मायदेशी परतावे लागले होते. रोहितला पुन्हा राष्ट्रीय संघात स्थान मिळविण्यासाठी फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे.