आपण नेहमीच क्रिकेटमध्ये पाहात असतो की, काही क्रिकेटपटू निवृत्तीनंतर समालोचन करतात, काही प्रशिक्षक बनतात; तर काही आपले चरित्रकथा लिहण्यात व्यस्त असतात. आपण पहिले असेल की, सचिन तेंडूलकर, एमएस सिंग धोनी यांसारख्या खेळाडूंवर चित्रपटसुद्धा निघाले आहेत. तसेच सचिन तेंडूलकर, राहुल द्रविड, विराट कोहली यांसारख्या खेळाडूंवर त्यांचा क्रिकेट कारकिर्दी आणि आयुष्याबद्दल आत्माचरित्र देखील निघाली आहेत. अशात भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनासुद्धा आपले नवीन आत्माचरित्र काढण्यात व्यस्त आहे.
माजी भारतीय अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना १४ जून रोजी आपले आत्माचरित्र ‘बिल्हीव’ या पुस्तकाचे उत्घाटन करण्यास तयार आहे. रैना सतत त्या पुस्तकाविषयी चर्चा करताना दिसत आहे आणि काही-ना-काही खुलासे करताना दिसत आहे. नुकतेच रैनाने प्रशिक्षक ग्रेग चॅपल असताना भारतीय संघाचे वातावरण कसे होते आणि वरिष्ठ खेळाडूंचा स्वभाव कसा होता? हे सांगितले आहे. (cricket senior players mocked me, suresh raina recalls dressing room atmosphere in greg chappell time)
रैनाने एकदा एका मुलाखतीत ड्रेसिंग रूमच्या वातावरणबद्दल सांगितले. त्याने सांगितले की, “वरिष्ठ खेळाडूंपैकी एक खेळाडू माझ्याजवळ आला आणि माझी मस्करी करून गेला. त्याने मला सांगितले की, मी एकटाच होतो, ज्याने सर्व अतिरिक्त सराव सामने खेळले. मी लगेच त्याला मस्करीमध्ये साथ दिली आणि विषय सोडून दिला.”
तसेच रैनाने सांगितले की, “धोनी आणि इरफानला भारतीय संघात स्थान देण्यात ग्रेग चॅपलचे महत्वाचे योगदान होते. तसेच भारतीय संघातील युवा खेळाडूंना विकसित करण्याचे श्रेयही या माजी प्रशिक्षकाला जाते. परंतु त्यांच्या काळात संघाचे वातावरण खूपच खराब झाले होते. आम्ही सकाळी वरिष्ठ खेळाडूंना अभिवादन करायचो. परंतु ते आम्हाला अभिवादन करत नसे. चॅपल प्रशिक्षक असताना संघ सहकारी माझी थट्टा करायचे. पण या सगळ्या गोष्टी मी कधीही मनावर घेतल्या नाहीत.”
रैनाने त्याचा खास सहकारी धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी निवृत्ती घोषित केल्यानंतर काहीच वेळाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सोडण्याचा निर्णय घेतला होता. रैना आणि धोनी सध्या चेन्नई सुपर किंग्सचे प्रतिनिधित्व करत आहेत.
रैनाची कारकिर्द पाहिल्यास रैनाने भारतीय संघासाठी २२६ एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि त्यात त्याने ५६१५ धावा केल्या आहेत. १८ कसोटी सामन्यात त्याने ७६८ धावा आणि ७८ टी-२० सामन्यात १६०४ धावा केल्या आहेत. तसेच भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये शतक करणारा पहिला खेळाडू ठरला. रैनाला ‘मिस्टर आईपीएल’ म्हणून सुद्धा ओळखले जाते. २०० आईपीएल सामन्यात त्याने ५४९१ धावा त्याने केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
झुंजार खेळीनंतर फक्त ९ धावांनी शतक हुकल्यावर ‘अशी’ होती गिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
कसोटी अजिंक्यपद जिंकत टीम इंडियाला इतिहास रचण्याची संधी, ‘हे’ मोठे विक्रमही निशाण्यावर
द्रविड की वडील, कोणाचा सल्ला ऐकशील? शुबमनने शक्कल लढवत दिले ‘हे’ उत्तर