Friday, February 3, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हे बरं नाही! चूक स्वत:ची अन् राग दुसऱ्यावर, विराटचा पंतवर आगपाखड करणारा व्हिडिओ पाहाच

हे बरं नाही! चूक स्वत:ची अन् राग दुसऱ्यावर, विराटचा पंतवर आगपाखड करणारा व्हिडिओ पाहाच

December 23, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
Virat-Kohli-And-Rishabh-Pant

Photo Courtesy: Twitter/Sudhakar0718


बांगलादेश दौऱ्यावर असलेला भारतीय संघ 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना यजमान संघासोबत खेळत आहे. हा सामना ढाकाच्या शेर ए बांगला या स्टेडिअमवर सुरू आहे. या सामन्यात बांगलादेश संघाने पहिल्या डावात 227 धावा चोपल्या होत्या. हे आव्हान भारतीय संघाने पार केले आणि दुसऱ्या दिवशी 314 चोपत 87 धावांची आघाडी घेतली.  मात्र, जेव्हा लंचदरम्यान भारताचा डाव 3 बाद 86 धावा होता, त्याआधी विराट कोहली आणि रिषभ पंत यांच्यात धाव घेण्यावरून गडबड झाली आणि विराट बाद होता होता राहिला. यानंतर तो भलताच रागात दिसला. दरम्यानचे व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

झाले असे की, लंचपूर्वी शेवटचे षटक मेहिदी हसन मिराज (Mehidy Hasan Miraz) टाकत होता. षटकातील शेवटच्या चेंडूवर विराट कोहली (Virat Kohli) याने मिड ऑनच्या दिशेने चेंडू टोलवला आणि धाव घेण्यासाठी धावला. मात्र, चेंडू क्षेत्ररक्षकाकडे असल्यामुळे रिषभ पंत (Rishabh Pant) याने धाव घेण्यास नकार दिला. खेळपट्टीच्या अर्ध्या भागापर्यंत गेलेल्या विराटला त्याचक्षणी पुन्हा स्ट्राईकच्या बाजूला धावावे लागले. यावेळी विराट कोहली क्रीझपर्यंत सुरक्षितरीत्या पोहोचला.

मात्र, यानंतर विराटने मागे वळून रिषभ पंतकडे पाहिले. विराट त्यावेळी भलताच रागात दिसला होता. विराटला वाटत होते की, यादरम्यान एक धाव आरामात झाली असते. मात्र, यामध्ये त्याला धावबाद होण्याची भीती वाटत होती. विराटने स्वत:च्या चुकीचा राग पंतवर काढला. यादरम्यानचे व्हिडिओ नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

That Stare from Virat Kohli..!
Damn..#INDvsBAN #ViratKohli #RishabhPant pic.twitter.com/LxGsGHZ8wl

— Dinne Sudhakar (@Sudhakar0718) December 23, 2022

The moment when Rishabh Pant’s soul left his body for a moment 😅#ViratKohli𓃵 pic.twitter.com/hlpaPfHQxY

— Sushant Mehta (@SushantNMehta) December 23, 2022

Virat Kohli reaction 😂🥶🥵
Le pant Bal bal Bach Gaya 🥱
Socho agar virat run out hota to pant bhaiya ka kya hota 🌝
Virat Kohli
Kohli
Pant
Video capture #SonySportsNetwork#INDvBAN #IPL2023 #iplauction2023 pic.twitter.com/DNC2ncPZjz

— Ajinkya Ajit Patil (@Ajinky__patil) December 23, 2022

मात्र, पुढेही विराटला या डावात खास कामगिरी करता आली नाही. विराटने या डावादरम्यान फक्त 24 धावा केल्या. तो तस्कीन अहमद याच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. लंचनंतर विराटने त्याची विकेट गमावली. पंतने शानदार खेळी साकारली आणि कसोटी क्रिकेटमधील 11वे अर्धशतक झळकावले.

भारतीय संघाने 87 धावांची आघाडी आता 80 वर आली आहे. बांगलादेशचे सलामीवीर नजमुल हुसेन शांतो (5) आणि झाकिर हसन (2) हे क्रीझवर नाबाद आहेत. वनडे मालिकेत भारतीय संघाला बांगलादेशकडून 2-1ने पराभवाचा धक्का बसला होता. आता कसोटी मालिकेत भारतीय संघ 1-0ने आघाडीवर आहे. हा सामना कोण जिंकतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (cricket virat kohli angry reaction on rishabh pant video viral see here)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वडिलांनी आयुष्यभर रिक्षा चालवली, पण पोराने मात्र एक आयपीएल लिलावात कमावले 5.50 कोटी
आयपीएल 2023च्या लिलावात मनीष पांडेवर लखनऊने केली पैशांची उधळण, बेस प्राईजपेक्षा दुप्पट रक्कम खिशात


Next Post
kavya maran

काव्या मारन पुन्हा व्हायरल, हॅरी ब्रूकला खरेदी केल्यानंतर दिली मस्त स्माईल

Sam Curran and Tom Curran

एक भाऊ कोटींमध्ये लोळतोय, तर दुसऱ्या भावाला मिळेना खरेदीदार

England

विश्वविजेत्या इंग्लिश खेळाडूंची आयपीएल लिलावात चांगलीच चांदी! सारेच बनले कोट्याधीश, एकही नाही लाखात

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143