पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात मंगळवारपासून (२७ जुलै) पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज संघात ५ सामन्यांची टी२० मालिका सुरु होणार होती. मात्र आता या मालिकेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. आता ही मालिका मंगळवारऐवजी बुधवारपासून (२८ जुलै) सुरु होईल. तसेच ५ ऐवजी ४ सामने या मालिकेत खेळवले जातील. या मालिकेच्या वेळापत्रकात कोरोनामुळे बदल करावा लागला आहे.
मालिकेच्या वेळापत्रकात बदल करण्याबद्दल वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डांच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर ५ ऐवजी ४ टी२० सामने खेळवण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला.
या कारणामुळे मालिकेत करावा लागला बदल
खरंतर पाकिस्तानविरुद्ध मालिका खेळण्यापूर्वी वेस्ट इंडिजची ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे मालिका आयोजित होती. या मालिकेतील सामने शनिवारी (२४ जुलै) संपणार होते. मात्र, गुरुवारी नियोजित दुसऱ्या वनडे सामन्यापूर्वी वेस्ट इंडिजच्या नॉन-प्लेइंग सदस्यांपैकी एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.
त्यामुळे, तात्काळ दुसरा सामना पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. दुसरा वनडे सामना नंतर शनिवारी पार पडला. त्यामुळे तिसरा वनडे सामनाही पुढे ढकलण्यात आला. तिसरा वनडे सामना सोमवारी (२६ जुलै) खेळवला जाणार आहे.
याचकारणामुळे वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान संघात मंगळवारपासून होणारी टी२० मालिकेचे वेळापत्रक बदलावे लागले. आता वेस्ट इंडिज विरुद्ध पाकिस्तान संघात २८ जुलैपासून टी२० मालिकेला सुरुवात होईल. ही मालिका ३ ऑगस्ट रोजी संपेल. त्यानंतर १२ ते २४ ऑगस्टदरम्यान २ कसोटी सामन्यांची मालिका होईल.
वेस्ट इंडिजच्या अध्यक्षांनी मानले पाकिस्तानचे आभार
वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाटे अध्यक्ष रिकी स्केरिट यांनी प्रसिद्धीपत्रकात जाहीर करत म्हटले की ‘पाकिस्तान क्रिकेट बोर्डाबरोबर आम्ही मालिकेबाबत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली. त्यानंतर दोन्ही बोर्ड या गोष्टीशी सहमत झाले की सध्याच्या परिस्थितीत एक टी२० सामना रद्द करुन ४ सामने खेळणे, हाच सर्वात उत्तर मार्ग आहे. आता बुधवारपासून टी२० मालिका सुरु होईल आणि बाकी दौऱ्यात काही बदल झालेले नाही. आम्ही सध्याची परिस्थिती समजून घेतल्याबद्दल पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मनी आणि सीईओ वसीम खान, तसेच पाकिस्तान क्रिकेट संघाचे आभारी आहोत.’
असा आहे पाकिस्तानचा वेस्ट इंडिज दौरा
२८ जुलै – पहिला टी२० सामना, ब्रिजटाऊन
३१ जुलै- दुसरा टी२० सामना, ब्रिजटाऊन
१ ऑगस्ट – तिसरा टी२० सामना, प्रोव्हिडन्स
३ ऑगस्ट – चौथा टी२० सामना, प्रोव्हिडन्स
१२-१६ ऑगस्ट – पहिला कसोटी सामना, किंग्सटन
२०-२४ ऑगस्ट – दुसरा कसोटी सामना, किंग्सटन
महत्त्वाच्या बातम्या –
मूर्ती लहान, पण कीर्ती महान! वयाच्या १३ व्या वर्षी ‘या’ मुलींनी टोकियो ऑलिंपिक्समध्ये रचला इतिहास
चित्त्यासारखी चपळता, अचूक निशाणा; संधी मिळताच इशानने शनाकाला केले यष्टीचीत, झाली धोनीची आठवण
जन गन मन… श्रीलंकेत भारताचे राष्ट्रगाण सुरू झाले अन् पठाण बंधूंच्या मुलांनी केलं असं काही