फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी कर्णधार ऍरॉन फिंच याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला होता. मात्र, आता त्याला पुन्हा एकदा मैदानावर चौकार-षटकारांची बरसात पाडायची आहे. तो पुन्हा मैदानावर परतण्यासाठी सज्ज झाला आहे. खरं तर, फिंचने लीजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी 6 फेब्रुवारी रोजी फिंचने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचद्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली होती.
‘लीजेंड्स लीग क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी खूप उत्साही’
ऍरॉन फिंच (Aaron Finch) म्हणाला की, “लीजेंड्स लीग क्रिकेट (Legends League Cricket) स्पर्धेत खेळण्यासाठी खूपच उत्साही आहे. माझा असा विश्वास आहे की, लीजेंड्स लीग एक शानदार उपक्रम आहे. या स्पर्धेत जुन्या दिग्गज खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळेल. मी या लीगमध्ये खेळण्याची आतुरतेने वाट पाहत आहे.”
लीजेंड्स लीग क्रिकेटचे संस्थापक काय म्हणाले?
दुसरीकडे, लीजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेचे संस्थापक आणि सीईओ रमन रहेजा यांनी फिंच लीगशी जोडला जाणार असल्यामुळे आनंद व्यक्त केला आहे. रहेजा म्हणाले की, “जेव्हा आम्ही ही लीग सुरू केली होती, तेव्हा आम्ही आश्वस्त होतो की, सर्व जुन्या खेळाडूंना पुन्हा एकदा मैदानावर आणण्यात यशस्वी होऊ. क्रिकेटला अलविदा केल्यानंतर अधिकतर क्रिकेटपटू समालोचन किंवा कोचिंग किंवा मग अकादम चालवत आहेत. मात्र, याव्यतिरिक्त असे अनेक माजी क्रिकेटपटू आहेत, जे अजूनही क्रिकेट खेळू शकतात. आम्ही अशा खेळाडूंना पुन्हा एकदा मैदानावर पाहू इच्छित होतो. यामध्ये ऍरॉन फिंचला पाहून आनंद होत आहे.”
ऍरॉन फिंचची कारकीर्द
ऍरॉन फिंच याच्या कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने ऑस्ट्रेलियाकडून एकूण 254 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यात कसोटीत त्याने 5 सामने खेळताना 27.8च्या सरासरीने 278 धावा केल्या होत्या. वनडेत त्याने 146 सामन्यात 38.89च्या सरासरीने 5406 धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त टी20त त्याने 103 सामने खेळताना 34.29च्या सरासरीने 3120 धावा चोपल्या आहेत. विशेष म्हणजे, टी20तील त्याची 172 ही आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. त्याने वनडे क्रिकेटमध्ये एकूण 17 आणि टी20मध्ये 2 शतके झळकावली आहेत.
हे खेळाडू पहिल्यांदाच खेळणार लीजेंड्स लीग क्रिकेटमध्ये
ऍरॉन फिंचव्यतिरिक्त इंग्लंडचा ऑयन मॉर्गन, भारताचा इरफान पठाण, पाकिस्तानचा शोएब अख्तर, वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल, एस. श्रीसंत, अब्दुल रज्जाक आणि इसरु उदाना पहिल्यांदा लीजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेत खेळताना दिसतील. (cricketer aaron finch joins legends leauge cricket tournament ceo and co founder raman raheja reaction read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
महिला प्रीमिअर लीगची चांदी! बीसीसीआयने टाटांकडे सोपवली ‘ही’ प्रचंड मोठी जबाबदारी
जडेजाचा कसोटीत नवा कीर्तिमान, स्वत:चाच रेकॉर्ड केला उद्ध्वस्त; बातमी वाचलीच पाहिजे