कसोटीतज्ज्ञ म्हणून ओळखला जाणारा भारतीय संघाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा याला वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी संघातून वगळले आहे. पुजाराला काढून कमी अनुभव असणाऱ्या खेळाडूंना संधी दिल्यामुळे अनेक भारतीय दिग्गजांनी परखड मते मांडली. यामध्ये आता पुजाराचे वडील आणि प्रशिक्षक अरविंद पुजारा यांनीही मत मांडले आहे. त्यांना वाटते की, पुजारा पुन्हा एकदा राष्ट्रीय संघात पुनरागमन करेल.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना झाल्यानंतर संघातून बाहेर काढल्यामुळे क्रिकेट जगतात चर्चा रंगलीये की, चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याने भारताकडून शेवटचा कसोटी सामना खेळला आहे. मात्र, अरविंद पुजारा (Arvind Pujara) यांनी म्हटले की, त्यांचा मुलगा राष्ट्रीय संघात पुनरागमन करू शकतो. त्याने आधीच दुलीप ट्रॉफीसाठी तयारीदेखील सुरू केली आहे.
ते म्हणाले की, “तो मानसिकरीत्या खूप मजबूत आहे. मी निवडीविषयी टिप्पणी करू शकत नाही. मात्र, मी जे पाहिले आहे, त्यात तो सर्वोत्तम फलंदाजी करत आहे. तो वेस्ट इंडिजविरुद्ध संघाच्या घोषणेनंतर त्याच दिवशी नेटमध्ये कठोर मेहनत घेत होता.” ते पुढे म्हणाले की, “त्याने दुलीप ट्रॉफीची तयारी सुरू केली आहे आणि काऊंटीत खेळणे सुरू ठेवेल. एक वडील आणि प्रशिक्षकाच्या रूपात माझ्यासाठी असे मानण्याचे कारण नाही की, तो पुनरागमन का नाही करू शकत.”
पुजारा 35 वर्षीय असून त्याने शनिवारी (दि. 24 जून) ट्विटरवर 9 सेकंदाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत पुजारा फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे.
???? ❤️ pic.twitter.com/TubsOu3Fah
— Cheteshwar Pujara (@cheteshwar1) June 24, 2023
पुजाराला संघातून बाहेर काढल्यामुळे हरभजन सिंग याने त्याला पाठिंबा दिला. हरभजन म्हणाला की, “चेतेश्वर पुजारा नाहीये, यामुळे मी चिंतेत आहे. तो भारतीय संघाचा मोठा खेळाडू आहे. आशा आहे की, त्याला विश्रांती दिली असेल आणि त्याला वगळले नसेल. पुजारा या संघाचा पाठीचा कणा आहे. जर तुम्ही त्याला वगळत असाल, तर इतर फलंदाजांची सरासरीही चांगली राहिली नाहीये.”
वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ
रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.
वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारताचा वनडे संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार. (cricketer cheteshwar pujara dropped for wi series father arvind pujara reacts)
महत्वाच्या बातम्या-
कुणाचं कमबॅक, तर कुणाची पहिलीच वेळ, ‘या’ 5 खेळाडूंना विंडीज दौऱ्यासाठी टीम इंडियात मिळाली जागा
शमीला वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी आणि वनडे संघातून का वगळलं? खरं कारण आलं समोर, लगेच वाचा