सध्या क्रिकेटविश्वात पाकिस्तान क्रिकेट संघाची चांगलीच चर्चा सुरू आहे. यामागील कारण आहे, अफगाणिस्तानविरुद्धची वनडे मालिका. पाकिस्तानने या मालिकेतील पहिला सामना 142 धावांनी जिंकला होता. त्यानंतर दुसरा सामना 1 विकेटने नावावर केला होता. तसेच, अखेरचा सामनाही 59 धावांनी खिशात घातला. यामुळे पाकिस्तानने अफगाणिस्तानचा सुफडा साफ करत मालिका 3-0ने नावावर केली. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत पाकिस्तानचा खेळाडू उत्साहाच्या भरात ऊप्स मोमेंटचा शिकार झाला.
सिनेजगतात कलाकार अनेकदा ऊप्स मोमेंटची शिकार होत असतात. मात्र, क्रिकेटजगतात असे पाहायला मिळेल, याबाबत कदाचितच कुणी विचार केला असेल. पाकिस्तान क्रिकेट संघ अफगाणिस्तानविरुद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खूपच रोमांचक पद्धतीने पार पडला. या सामन्यात इतका ड्रामा होता की, विजयानंतर पाकिस्तानी खेळाडूंचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
नेमकं काय घडलं?
अखेरच्या षटक पाकिस्तानने नसीम शाह याच्या चौकाराच्या जोरावर अफगाणिस्तानविरुद्ध शानदार विजय मिळवला. पहिल्या चेंडूवर शादाब खान फजलहक फारूकीच्या चेंडूवर मंकडिंग पद्धतीने धावबाद झाला होता. त्यामुळे एक भलत्याच वादाला ठिणगी पडली होती. यानंतर सामना जास्त रोमांचक वळणावर पोहोचला. पाकिस्तानला विजयासाठी 6 चेंडूत 11 धावांची गरज होती. यावेळी फलंदाज नसीम शाहने पहिल्या चेंडूवर चौकार मारला. त्यानंतर पुन्हा चार धावा बनल्या आणि पाचव्या चेंडूवर पुन्हा चौकार मारत संघाला विजयी केले.
यादरम्यान पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज इमाम उल हक टॉवेल (Imam Ul Haq Towel) घालून बसला होता. तो सामना जिंकल्यानंतर टॉवेलमध्येच बाहेर आला. तो जसा विजयाचा जल्लोष साजरा करू लागला, तसा त्याचा टॉवेल सुटला. यावेळी त्याची ही रिऍक्शन कॅमेऱ्यात कैद झाली आणि ते घडले, जे घडायला नको होतं.
एका युजरने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “इमाम खूपच उत्साहात होता, टॉवेल घातलाय हे देखील तो विसरला.” यासह युजरने हसणाऱ्या आणि हार्ट इमोजीचाही समावेश केला आहे.
Imam was so excited he forgot he was wearing Towel😂♥️.#Imamulhaq #PAKvAFG #AFGvPAK #PakvsAfg pic.twitter.com/j0kCxxw56x
— Shaharyar Ejaz 🏏 (@SharyOfficial) August 25, 2023
अशात नेटकरी या व्हिडिओवर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. काहींनी हसणाऱ्या इमोजी कमेंट्स केल्या आहेत, तर काहीजण “बरं झालं टॉवेल निघाला नाही” असे म्हणत आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत 1 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
Immi bhai what?😭😭 pic.twitter.com/pf1Bxviyn2
— cricket_diaries (@cric_diaries) August 25, 2023
आशिया चषकाचा पहिला सामन
पाकिस्तान क्रिकेट संघ आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेत खेळताना दिसेल. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात 30 ऑगस्ट रोजी पाकिस्तान आणि नेपाळ (Pakistan And Nepal) संघ आमने सामने आहेत. हा सामना मुल्तान येथे पार पडणार आहे. (cricketer imam ul haq towel video goes viral during 2nd odi against afghanistan see here)
हेही वाचा-
Video: आऊट झाल्याच्या रागात फलंदाजाने फेकली बॅट; पुढं जे झालं, ते तुम्हीच पाहा
आगामी आशिया चषकातही भारतीय संघाला विराटकडून अपेक्षा, पाकिस्तानविरुद्ध गेल्या 5 सामन्यात घातलाय राडा