सहसा आपण पाहतो की, क्रिकेटमध्ये ‘प्लेअर ऑफ द मॅच’ आणि ‘प्लेअर ऑफ द सीरिज’ पुरस्कार पटकावणाऱ्या खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडतो. त्यांना बक्षीस म्हणून लाखो रुपये दिले जातात. मात्र, अनेक देशांमध्ये पैसेच दिले जातील, असे नाही. असेच काहीसे आता न्यूझीलंडमध्ये घडले. न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विलियम्सन याने श्रीलंकेविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत खोऱ्याने धावा काढल्या. तसेच, संघाला यादगार विजय मिळवून दिला. या मालिकेतील कामगिरीसाठी त्याला ‘प्लेअर ऑफ द सीरिज’ म्हणजेच मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी त्याला विचित्र बक्षीस देण्यात आले, जे ऐकून प्रत्येकाच्याच भुवया उंचावल्या आहेत.
खरं तर, केन विलियम्सन (Kane Williamson) याने श्रीलंकेविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत द्विशतकाच्या मदतीने 337 धावांचा पाऊस पाडला. यादरम्यान त्याने 168.50च्या सरासरीने धावा काढल्या. यादरम्यान त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही 215 इतकी होती. विलियम्सनच्या दमदार खेळीच्या जोरावर यजमान संघाने पाहुण्या श्रीलंका संघाला मालिकेत क्लीन स्वीप केले. या विजयानंतर केन विलियम्सनला मालिकावीर पुरस्काराच्या रूपात 150 लीटरचा पेंट मिळाला. याची माहिती स्वत: न्यूझीलंड क्रिकेटने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटरवरून दिली आहे.
Your Dulux Player of the Series, Kane Williamson.
– 337 runs
– 168.50 average
– 215 highest score
– 150 litres of Dulux paint for Te Puke Cricket Club. #NZvSL pic.twitter.com/fo0JaObyfb— BLACKCAPS (@BLACKCAPS) March 20, 2023
विलियम्सनला भेट म्हणून मिळालेल्या पेंट बॉक्सचा वापर काय?
केन विलियम्सन याला जो पेंट मिळाला आहे, त्याची किंमत जवळपास 16 हजार रुपये आहे. न्यूझीलंड क्रिकेटने ट्वीट करत सांगितले आहे की, पेंटचा वापर टी प्यूक क्रिकेट क्लबला रंग देण्यासाठी केला जाणार आहे. विलियम्सनने ख्राईस्टचर्च येथे खेळल्या गेलेल्या कसोटीत नाबाद शतक ठोकले होते. त्यावेळी त्याने नाबाद 121 धावा केल्या होत्या. त्यानंतर वेलिंग्टन कसोटीत त्याने 215 धावा करत द्विशतक झळकावले होते.
विलियम्सनची 4 डावातील कामगिरी
ख्राईस्टचर्च कसोटी सामन्यात विलियम्सन याने शेवटच्या चेंडूवर आपल्या संघाला वजय मिळवून दिला होता. विलियम्सनच्या मागील 4 डावांबद्दल बोलायचं झालं तर, तो शानदार फॉर्ममध्ये खेळला. त्याने मागील 4 डावात 2 शतके आणि 1 द्विशतक ठोकले आहे. विलियम्सन आता आयपीएल 2023 स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. तो यावेळी गतविजेत्या गुजरात टायटन्स संघाकडून आयपीएलमध्ये खेळताना दिसेल.
आयपीएलच्या 16व्या हंगामाची सुरुवात 31 मार्चपासून होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. (cricketer kane williamson recieves 150 litre paint for player of the series award new zealand vs sri lanka test series)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पहिल्या हंगामातील विराट अन् स्मृतीची निराशाजनक आकडेवारी, वाचून RCBच्या चाहत्यांचंही दुखेल मन
‘ही’ आहेत IPLमधील सर्वात दुर्लक्षित केले गेलेले दोन भारतीय खेळाडू, विश्वास बसणे कठीण; कुंबळेचा खुलासा