मनीष पांडे लवकरच अडकणार या अभिनेत्रीबरोबर विवाहबंधनात?

भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज मनीष पांडे लवकरच विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे. तो दाक्षिणात्य अभिनेत्री अश्रिता शेट्टीबरोबर डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याची  सध्या चर्चा आहे.

मिड-डे ने दिलेल्या माहितीनुसार मनिष पांडे यावर्षी 2 डिेसेंबरला विवाहबंधनात अडकेल. त्याचा विवाहसोहळा मुंबईमध्ये पार पडेल. दोन दिवसाच्या या सोहळ्यासाठी त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित राहतील.

तसेच वेस्ट इंडीजबरोबर भारताची टी20 मालिका 6 डिसेंबरपासून सुरु होणार असल्याने आणि या मालिकेतील पहिला सामना मुंबईतच होणार असल्याने भारतीय क्रिकेटपटूही मनिष पांडेच्या विवाहसोहळ्यात उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

मनीष पांडेची होणारी पत्नी दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिचे वय-वर्षे 26 असून तिने आत्तापर्यंत बऱ्याच दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. त्यापैकी इंद्रजीत, ओरू कन्नियुम मुनू कलावानिकलूम आणि उधयम एनएच4 या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.

You might also like