एशियन गेम्स 2023 स्पर्धेसाठी भारतीय पुरुष क्रिकेट संघ चीनमधील हॅंगझू शहरात पोहोचला आहे. या स्पर्धेत भारतीय संघ 3 ऑक्टोबरपासून आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. भारतीय संघात डावखुरा फलंदाज रिंकू सिंगचाही समावेश आहे. एशियन गेम्स स्पर्धेसाठी तेथे उपस्थित असलेल्या भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याची त्यांनी भेट घेतली. रिंकूने ही छायाचित्रे आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहेत.
रिंकूने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून दोन छायाचित्रे शेअर केली आहेत. पहिल्या छायाचित्रात रिंकू सिंग व नीरज चोप्रा दिसत आहे. दुसऱ्या छायाचित्रात नीरजसोबत भारतीय संघातील इतर अनेक खेळाडू दिसले. यामध्ये अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, जितेश शर्मा आणि आवेश खान यांचा समावेश आहे.
https://www.instagram.com/p/CxuLN00oQzI/?igshid=MzRlODBiNWFlZA==
भारतीय क्रिकेट संघ 3 ऑक्टोबरपासून आपल्या मोहिमेला सुरुवात करेल, तर भारताचा स्टार भालाफेकपटू ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा 4 ऑक्टोबरला मैदानात दिसणार आहे. नीरजने गेल्या वेळी एशियन गेम्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. अशा परिस्थितीत यावेळीही तो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकावर मिळवेल, अशी आशा आहे.
भारतीय क्रिकेट संघाबद्दल बोलायचे झाल्यास, संघ 3 ऑक्टोबर रोजी थेट उपांत्यपूर्व फेरीत पहिला सामना खेळेल. पुरुष क्रिकेटचा सुवर्णपदक सामना 7 ऑक्टोबर रोजी होणार आहे. मात्र, तेथे पोहोचण्यासाठी त्यांना उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीचे सामने जिंकावे लागतील. या स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करेल.
(Cricketer Rinku Singh Shared Photo With Neeraj Chopra At Asian Games)
हेही वाचा-
दक्षिण आफ्रिकेला तगडा झटका! वर्ल्डकप 2023पूर्वी मायदेशी परतला कॅप्टन, कोण हाकणार संघाचा गाडा?
Breaking: बांगलादेश क्रिकेटमध्ये भूकंप! वर्ल्डकप आधीच कर्णधार शाकिबची निवृत्तीची घोषणा