जगातील दिग्गज फुटबॉलपटूंमध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्या नावाचा समावेश होतो. रोनाल्डो नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतो. अशात तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी चर्चेत येण्यामागील कारण आहे त्याची कमाई. रोनाल्डो याने युरोपचा फुटबॉल क्लब मॅनचेस्टर युनायटेडची साथ सोडून सौदी अरेबियाचा फुटबॉल क्लब अल नासिर संघाशी करार केला आहे. रोनाल्डो आणि अल नासिर यांच्यात झालेला करार हा क्रीडाविश्वातील सर्वात महागडा करार मानला जात आहे. यासोबतच आता कमाईच्या बाबतीत फुटलबॉलसारख्या खेळासमोर क्रिकेटचा टिकाव लागत नसल्याची चर्चा रंगली आहे.
सौदी अरेबियाचा फुटबॉल क्लब अल नासिर (Saudi Arabia Football Club Al Nassr) संघाकडून खेळण्यासाठी ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) याला दरवर्षी 1800 कोटी रुपये मिळणार आहेत. मात्र, जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग असणाऱ्या आयपीएलमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूला इतके रुपये कमावण्यासाठी जवळपास 150 वर्षांपर्यंत क्रिकेट खेळावे लागेल. यावरून स्पष्ट होते की, जगभरात क्रिकेट खेळ कितीही प्रसिद्ध असला, तरीही फुटबॉलच्या बरोबरीने उभे राहण्यासाठी क्रिकेटला आणखी लांबचा पल्ला गाठावा लागेल.
रोहित शर्मा, एमएस धोनी, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा हे असे खेळाडू आहेत, जे आयपीएलच्या (IPL) पहिल्या हंगामापासून आतापर्यंत खेळत आले आहेत. कमाईच्या बाबतीत रोहित शर्मा (Rohit Sharma) सर्वांच्या पुढे आहे. आयपीएलचे 15 हंगाम खेळून रोहितने 178 कोटी रुपयांची कमाई केली आहे. याची सरासरी काढली, तर रोहितने दरवर्षी आयपीएल खेळून जवळपास 12 कोटी रुपये कमाई केली आहे. त्यामुळे रोहितला 1800 कोटी रुपये कमावण्यासाठी जवळपास 150 वर्षे आयपीएल खेळावे लागेल.
क्रिकेटपेक्षा खूपच पुढे आहे फुटबॉल
इतर खेळाडूंबद्दल बोलायचं झालं, तर धोनीने आयपीएलच्या 15 हंगामात खेळून 176 कोटी रुपयांची कमाई केली आहे. दुसरीकडे, विराटने आयपीएलचे 15 हंगाम खेळून 173 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तसेच, जडेजाने आयपीएलमधून 109 कोटी रुपयांची कमाई केली आहे. फक्त 7 असे खेळाडू आहेत, ज्यांनी आयपीएलमधून 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे.
यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, कोणताही क्रिकेटपटू संपूर्ण कारकीर्दीत इतकी कमाई करू शकत नाहीत, जेवढी कमाई रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी (Lionel Messi) हे एका वर्षात कोणत्याही क्लबसोबत करार करून कमावतात. आयपीएलमध्ये सर्वात महागडा ठरलेल्या खेळाडूची कमाई 18 कोटी रुपये आहे. त्या खेळाडूलाही रोनाल्डोच्या एका वर्षाच्या कमाईची बरोबरी करण्यासाठी 100 वर्षे आयपीएल खेळावे लागेल. अशाप्रकारे फुटबॉल आणि क्रिकेट खेळाडूंच्या कमाईतील फरक स्पष्ट होतो. (cricketer rohit sharma to play 150 years in ipl to equals cristiano ronaldo one year income)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आधीच संघातून बाहेर असणाऱ्या ‘या’ खेळाडूला चहलने डिवचले, व्हिडिओत कैद झाली घटना
तब्बल 3 वर्षानंतर पुण्यात येतीये टीम इंडिया! भारत- श्रीलंका दुसऱ्या टी20 सामन्याबद्दल सर्वकाही घ्या जाणून