शोएब मलिक याची गणना पाकिस्तानच्या दमदार फलंदाजांमध्ये होते. सानिया मिर्झाचा पती शोएब मलिक हा पुढील महिन्यात म्हणजेच 1 फेब्रुवारी रोजी 41 वर्षांचा होईल. मात्र, त्याने पाकिस्तान संघात पुनरागमन करण्याच्या आशा अजूनही सोडल्या नाहीयेत. खरं तर, मागील दीर्घ काळापासून शोएबला संघात जागा दिली जात नाहीये. त्याने त्याचा शेवटचा सामना नोव्हेंबर 2021मध्ये खेळला होता. त्यानंतर आता त्याने त्याच्या पुनरागमनाविषयी प्रश्न उपस्थित केले आहे.
‘माझा फिटनेस 25 वर्षांच्या खेळाडूसारखा’
शोएब मलिक (Shoaib Malik) याचा विश्वास आहे की, तो अजूनही क्रिकेट खेळू शकतो. तो म्हणाला की, “तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. हे खरंय की, मी संघातील सर्वात वयस्कर खेळाडू आहे. मात्र, माझा फिटनेस 25 वर्षांच्या खेळाडूंपेक्षा चांगला आहे. मला पाकिस्तानसाठी आणखी क्रिकेट खेळायचे आहे. माझ्यात खेळण्याची भूक बाकी आहे. मी सध्या निवृत्तीचा कोणताही विचार करत नाहीये. माझे लक्ष्य पाकिस्तान क्रिकेट संघात पुनरागमन करण्यावर आहे.”
‘सध्या निवृत्तीचा विचार नाही’
शोएब मलिक याने पुढे बोलताना म्हटले की, “जेव्हा क्रिकेटला रामराम ठोकेल, तेव्हा सर्व क्रिकेट प्रकार आणि लीग क्रिकेटमधूनही निवृत्ती घेईल. परंतु सध्या माझा असा कोणताही विचार नाहीये. मी सध्या माझ्या क्रिकेटचा आनंद घेत आहे. मी कसोटी क्रिकेटमधून आधीच बाहेर पडलो आहे, पण वनडे आणि टी20 क्रिकेट प्रकारासाठी कायम उपलब्ध आहे.” पाकिस्तानी अष्टपैलू पुढे म्हणाला की, “मला जेव्हाही संधी मिळेल, मी माझे सर्वोत्तम देईल.”
https://www.instagram.com/p/Cj0ABn2ommt/?hl=en
याव्यतिरिक्त शोएब मलिक याला विश्वास आहे की, नजम सेठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष बनल्यानंतर त्याला अनेक संधी मिळतील. शोएबने पाकिस्तानकडून आतापर्यंत 35 कसोटी, 287 वनडे आणि 124 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने 1898 धावा, वनडेत 7534 धावा आणि टी20त 2435 धावा केल्या आहेत. तसेच, गोलंदाजीत त्याने कसोटीत 32 विकेट्स, वनडेत 158 विकेट्स आणि टी20त 28 विकेट्स घेतल्या आहेत.
सध्या, शोएब मलिक बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये रंगपूर रायडर्स संघाकडून खेळत आहे. (cricketer shoaib malik on his retirement also talked on fitness read what he said)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
म्हारी छोरियां छोरों से कम हैं के! वर्ल्डकप विजयानंतर भारतीय महिलांचा ‘काला चष्मा’वर धमाल डान्स
पहिल्या दोन टी20त फ्लॉप ठरलेल्या गिल-ईशानपैकी कुणाच्या जागी मिळावी पृथ्वीला संधी? जाफरने स्पष्टच सांगितलं