IPLक्रिकेटटॉप बातम्या

सचिनकडून कौतुक होताच मॅचविनर गिलने शेअर केला शर्टलेस फोटो, 3 तासात पडला 1 मिलियन लाईक्सचा पाऊस

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात गुजरात टायटन्स संघाचा युवा स्टार फलंदाज शुबमन गिल याने अक्षरश: धावांचा पाऊस पाडला. त्याने संघासाठी नाबाद 104 धावा केल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर गुजरात संघाने आरसीबी संघाला या सामन्यात 6 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. या सामन्यात विराट कोहली यानेही नाबाद 101 धावांची खेळी साकारली होती, पण गिलच्या खेळीने विराटच्या खेळीवर पाणी फेरले. तसेच, या विजयानंतर मुंबई इंडियन्स संघानेही प्ले-ऑफमध्ये आपली जागा पक्की केली.

मुंबई इंडियन्स संघ प्ले-ऑफमध्ये पोहोचल्यानंतर संघाचा मार्गदर्शक आणि भारतीय संघाचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने ट्वीट केले. ट्वीट करत सचिन तेंडुलकर शुबमन गिल (Sachin Tendulkar Shubman Gill) याला धन्यवाद देताना दिसला. तसेच, मजेशीर अंदाजात लिहिले की, त्याने मुंबईसाठी चांगली फलंदाजी केली. सचिनच्या या ट्वीटनंतर शुबमन गिल (Shubman Gill) याने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला.

शुबमन गिल इंस्टाग्राम पोस्ट
शुबमन गिल इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत सर्वत्र चर्चेत आला. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “थर्स्ट ट्रॅप.” या फोटोत तो शर्टलेस दिसला. तसेच, तो त्याचे ऍब्जही दाखवताना दिसला. त्याच्या एका हातात फोनही होता.

https://www.instagram.com/p/CsiwwptJsnv/

आता त्याची ही पोस्ट चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. त्याच्या या पोस्टवर 3 तासात 10 लाखांहून अधिक चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला. तसेच, 23 हजारांहून अधिक चाहत्यांनी कमेंट्स केल्या. एकाने लिहिले की, “गिल भावा आख्ख्या बेंगलोरला हालवून टाकलेस.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “भावाने आख्ख्या आरसीबी संघाच्या चाहत्यांना रडवले.” आणखी एकाने असे लिहिले की, “आरसीबीला धुवून ऍब्ज निघाले.”

खरं तर, गुजरात संघाचा सलामीवीर शुबमन गिल आयपीएलच्या या हंगामात शानदार फॉर्ममध्ये आहे. तसेच, त्याने या हंगामात आतापर्यंत खेळलेल्या 14 सामन्यात सलग दोन शतके झळकावली आहेत. यासह त्याने शिखर धवन, जोस बटलर आणि विराट कोहली यांसारख्या दिग्गज फलंदाजांच्या यादीत स्थान मिळवले आहे. आयपीएल 2023 हंगामातील साखळी फेरी संपल्यानंतर सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत गिल दुसऱ्या स्थानी आहे. त्याने या हंगामात 14 सामन्यात 680 धावा केल्या आहेत. त्यात 2 शतके आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही नाबाद 104 इतकी आहे. (cricketer shubman gill share shirtless picture after after receiving praise from sachin tendulkar)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
संपलाय रे तो! IPL 2023 दिनेश कार्तिकचा शेवटचा हंगाम? खराब सिझनविषयी आली मोठी प्रतिक्रिया
IPL 2023च्या पहिल्या क्वालिफायरसाठी चेन्नई-गुजरात सज्ज, एकाच क्लिकवर जाणून घ्या सर्व माहिती

Related Articles