लखनऊ येथील इकाना क्रिकेट स्टेडिअममध्ये झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यानंतर चांगलाच वादंग निर्माण झाला. या मैदानातील खेळपट्टी टी20 क्रिकेटसाठी योग्य नसल्याचे भारतीय कर्णधार हार्दिक पंड्या याने म्हटले होते. मात्र, विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव याचे विचार जरा वेगळे आहेत. त्याने इकाना स्टेडिअमच्या खेळपट्टी वादाला महत्त्व न देत मंगळवारी (दि. 31 जानेवारी) खेळपट्टीचा फरक पडत नाही म्हटले. तसेच, तो कोणत्याही प्रकारच्या खेळपट्टीवर खेळण्यासाठी तयार असल्याचेही त्याने सांगितले.
रविवारी (दि. 29 जानेवारी) न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात 100 धावांच्या कमी धावसंख्येच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाच्या नाकी नऊ आल्या होत्या. सामन्यानंतर भारतीय कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने लखनऊची खेळपट्टी धक्कादायक असल्याचे म्हटले होते. त्यानंतर पीच क्यूरेटरलाही काढून टाकण्यात आले होते.
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या टी20 सामन्यापूर्वी मोठे भाष्य केले. तो म्हणाला की, “आम्ही (हार्दिक आणि मी) नंतर याबाबत चर्चा केली. तसेच, हे निश्चित केले की, भविष्यात आम्हाला जी खेळपट्टी मिळेल, आम्ही त्याबाबत तक्रार करणार नाही. हे पूर्णपणे ठीक आहे.”
विस्फोटक फलंदाज सूर्यकुमारने म्हटले की, “याचा काहीही फरक पडत नाही की, तुम्ही कोणत्या खेळपट्टीवर खेळता. या गोष्टींवर तुमचे नियंत्रण नसते. आम्ही तेच केले, जे आमच्या नियंत्रणात होते. आम्हाला त्यानुसार जुळवून घ्यायचे होते. तसेच, त्या परिस्थितीनुसार पुढे जायचे होते. मात्र, हा रोमांचक सामना होता.”
पुढे बोलताना सूर्यकुमारने असेही म्हटले की, “वनडे असो किंवा टी20, कमी धावसंख्येचा असो किंवा जास्त. जर सामना प्रतिस्पर्धी असला, तर मला वाटत नाही की, खेळपट्टीचा फरक पडतो. तुम्ही मैदानावर जाता, तेव्हा तुमच्याकडे आव्हान असते. तुम्ही ते स्वीकारता आणि पुढे जाता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वी मी भरपूर घरगुती क्रिकेट खेळलो. त्यातून मला खूप मदत मिळाली आहे.”
“तुम्हाला स्वत:वर खूप मेहनत घ्यावी लागते. तसेच, वेगवेगळ्या आव्हानात्मक खेळपट्टीवर खेळताना केलेल्या मेहनतीला मी पुढे आणले. मी संघातील अनुभवी खेळाडूंना पाहून, त्यांच्याशी बोलून खूप काही शिकलो आहे,” असेही पुढे बोलताना सूर्यकुमार म्हणाला.
सूर्यकुमार 9 फेब्रुवारीपासून नागपूर येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू होणाऱ्या बहुप्रतिक्षित कसोटी मालिकेत पदार्पण करू शकतो. याविषयी विचारले असता, तो म्हणाला की, “निश्चितच प्रत्येकाची कसोटी क्रिकेट खेळायची इच्छा आहे. तुम्ही तुमचे क्रिकेट घरगुती स्तरावर सुरू करता, तेव्हा फक्त लाल चेंडूने खेळता. मी मुंबईसाठी खेळलो आहे.”
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील तिसरा टी20 सामना बुधवारी (दि. 1 फेब्रुवारी) सायंकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. या सामन्याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. हा सामना जिंकला, तर हार्दिक पंड्याच्या नावावर खास विक्रम नोंदवला जाईल. तसेच, जर पराभव मिळाला, तर नकोशा विक्रमाची नोंदही होईल. (cricketer suryakumar yadav said pitch not matter in any match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पंड्या अन् सँटनरची नजर मालिका खिशात घालण्यावर, जाणून घ्या तिसऱ्या टी20 सामन्याविषयी सर्वकाही
चंडिका हाथुरुसिंघा पुन्हा बनले बांगलादेशचे मुख्य प्रशिक्षक, ‘या’ तारखेला स्वीकारणार कार्यभार