---Advertisement---

IND vs AUS वनडे मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच माजी कर्णधाराची अचानक निवृत्ती

IND-vs-AUS
---Advertisement---

सध्या ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर आहे. 4 सामन्यांची कसोटी मालिका संपल्यानंतर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेला 17 मार्चपासून सुरुवात होणार आहे. मात्र, यापूर्वीच ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधून मोठी बातमी समोर येत आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटी कर्णधार टीम पेन याने मोठी घोषणा केली आहे. या घोषणेमुळे क्रिकेटविश्वात खळबळ माजली आहे.

टीम पेन (Tim Paine) देशांतर्गत क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त झाला आहे. टास्मानिया टायगर्स संघाचा 38 वर्षीय खेळाडू टीम पेन याने होबार्ट येथे क्वीन्सलँडविरुद्ध त्याचा शेवटचा शेफील्ड शिल्ड सामना खेळला. यावेळी त्याला संघसहकाऱ्यांकडून ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला. पेनने अखेरच्या सामन्यातील पहिल्या डावात 62 चेंडूत 42, तर दुसऱ्या डावात 3 धावांच केल्या होत्या.

https://twitter.com/TasmanianTigers/status/1636597761280995329

टीम पेन याने टास्मानिया संघाचे 95 शेफील्ड शिल्ड सामन्यात प्रतिनिधित्व केले. त्याने त्याचा पहिला प्रथम श्रेणी सामना दक्षिण ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2005मध्ये खेळला होता. त्याने त्याच्या कारकीर्दीत यष्टीमागून 296 फलंदाजांना बाद केले. हा राज्य पातळीवरील एक मोठा विक्रम आहे.

पेनची शेफील्ड शिल्डमधील कामगिरी
टीम पेन याच्या देशांतर्गत क्रिकेटमधील शेफील्ड शिल्ड स्पर्धेतील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने एकूण 95 सामने खेळले. त्यातील 165 डावांमध्ये फलंदाजी करताना त्याने 28.17च्या सरासरीने 4114 धावा केल्या. या धावा करताना त्याने 3 शतके आणि 21 अर्धशतकेही झळकावली. विशेष म्हणजे, पेनने टास्मानियाला दोन वेळा शेफील्ड शिल्ड (Sheffield Shield) स्पर्धेचे विजेतेपद जिंकून दिले आहे. त्याने 2010 आणि 2021 यादरम्यान 18 शेफील्ड शिल्ड सामन्यांमध्ये ‘टायगर्स’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या टास्मानिया संघाचे नेतृत्व केले होते. यातील त्याने 7 सामन्यात विजय मिळवला होता.

टीम पेनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
टीम पेन याने ऑस्ट्रेलियाकडून 35 कसोटी सामने, 35 वनडे सामने आणि 12 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्याने 2018 आणि 2021 दरम्या 23 सामन्यात कसोटी संघाचे नेतृत्वही केले होते. त्याने कसोटीत 1534 धावा, वनडेत 890 धावा आणि टी20त 82 धावा केल्या आहेत. (Cricketer Tim Paine retires from all forms of domestic cricket)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहितच्या अनुपस्थितीत कशी असू शकते टीम इंडिया? पहिल्या वनडे सामन्याविषयी सर्व माहिती एकाच क्लिकवर
स्टेडिअममध्ये पाय ठेवायला नव्हती जागा, कट्टर क्रिकेटप्रेमी चढले झाडावर, ‘या’ क्रिकेट सामन्याला तुफान गर्दी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---