जगात भारी असलेली टी२० लीग म्हणजे इंडियन प्रीमिअर लीग होय. आयपीएलच्या १५व्या हंगामाला सुरुवात झाली असून यातील ३ सामने आतापर्यंत खेळले गेले आहेत. यातील पाचवा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स संघात मंगळवारी (२९ मार्च) पुण्याच्या एमसीए स्टेडिअममध्ये खेळला जाणार आहे. आयपीएल २०२१मध्ये निराशाजनक कामगिरीनंतर हैदाराबाद संघ या हंगामात नव्या जोशात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. नवीन खेळाडूंच्या एन्ट्रीनंतर हा संघ खूपच मजबूत दिसत आहे. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओत दिसते की, खेळाडू एकमेकांमध्ये मिसळले आहेत.
राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या (Rajasthan Royals) सामन्यापूर्वी हैदराबादचे (Sunrisers Hyderabad) खेळाडू मजा-मस्ती करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडिओही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये निकोलस पूरन (Nicholas Pooran) आणि वेगवान गोलंदाज उमरान मलिक (Umran Malik) पैज लावताना दिसत आहेत.
या व्हिडिओत दिसते की, हैदराबादचे खेळाडू मुख्य प्रशिक्षक टॉम मूडीच्या मार्गदर्शनाखाली नेट सेशनमध्ये सराव करत असतात. तेव्हाच पूरन उमरानला खुले आव्हान देतो की, “जर तू पुढचा चेंडू यॉर्कर टाकला, तर मी तुला डिनरला घेऊन जाईल. मात्र, तू यॉर्कर टाकू शकला नाही, तर तू मला डिनरला घेऊन जायचं.”
Did Umran buy you dinner as promised, @nicholas_47? 🤣#OrangeArmy #ReadyToRise #TATAIPL pic.twitter.com/LvDlzFwUMc
— SunRisers Hyderabad (@SunRisers) March 28, 2022
पूरनच्या या अटीवर उमरान मलिक म्हणतो की, “शब्द दिला?” इतके बोलून उमरान मलिक पुढचा चेंडू टाकण्यासाठी जातो. जेव्हा त्याच्या हातातून चेंडू निघतो, तेव्हा तो यॉर्कर पडत नाही. त्यामुळे तो पूरनकडून पैज हारतो. या मजेशीर व्हिडिओला चाहत्यांची जोरदार पसंती मिळत आहे.
उमरान मलिकच्या आयपीएल कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत फक्त ३ सामने खेळले आहेत. हे सामने खेळताना ८च्या इकॉनॉमी रेटने २ विकेट्स घेतल्या आहेत. दुसरीकडे निकोलस पूरनच्या कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत ३३ सामने खेळले आहेत. त्यातील ३१ डावात फलंदाजी करताना त्याने २२.४४च्या सरासरीने ६०६ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
ग्लेन मॅक्सवेलचे लागले भारतीय पद्धतीने लग्न, वरमाळा घालतानाचा Video तुफान व्हायरल
RCBvsPBKS : बेंगलोरने फलकावर लावल्या २०५ धावा अन् तिथेच निश्चित झाला पराभव, वाचा सविस्तर
अर्रर्र, लईच वाईट झालं! मुंबईचा कर्णधार रोहितला दुहेरी धक्का, पहिली मॅच पण हरली आणि दंडही झाला