Wednesday, February 1, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘मी भविष्यवाणी करतोय विश्वचषकात विराट गंभीरसारखाच…’, भारताच्या माजी दिग्गजाचे मोठे भाष्य

'मी भविष्यवाणी करतोय विश्वचषकात विराट गंभीरसारखाच...', भारताच्या माजी दिग्गजाचे मोठे भाष्य

January 6, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Virat-Kohli

Photo Courtesy: Twitter/ICC


भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली सध्या सुट्ट्यांचा आनंद लुटतोय. त्याने बांगलादेश कसोटी मालिकेनंतर विश्रांती घेतली आहे. भारत विरुद्ध श्रीलंका संघात सुरू असलेल्या टी20 मालिकेतही त्याचा समावेश नाहीये. तो श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतूनच मैदानावर पुनरागमन करणार आहे. श्रीलंकाविरुद्ध 3 सामन्यांच्या वनडे मालिकेला 10 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. यामध्ये विराटचा जलवा पाहायला मिळेल.

आता विराट कोहली (Virat Kohli) याच्याबद्दल माजी क्रिकेटपटू कृष्णमाचारी श्रीकांत ( Krishnamachari Srikkanth) यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. ते म्हणाले आहेत की, विराट यावर्षीच्या वनडे विश्वचषकात तशीच कामगिरी करेल, जशी गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने 2011च्या वनडे विश्वचषकात केली होती. विशेष म्हणजे, त्या विश्वचषकात गंभीर भारतीय संघासाठी सामना पालटणारा खेळाडू ठरला होता.

‘मी भविष्यवाणी करतोय’
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना श्रीकांत म्हणाले की, “एका खेळाडूच्या रूपात 83चा विश्वचषक जिंकणे आणि पुन्हा 2011 वनडे विश्वविजेत्या भारतीय संघाचा मुख्य निवडकर्ता होण्याची भावना सुखद असते. ही एक अशी कहाणी आहे, जी मी माझ्या नातवांना सांगू शकतो. गौतम गंभीर याने खेळलेली खेळी अभूतपूर्व होती, ती देखील विश्वचषकात. त्याला शुभेच्छा. मला त्याचा अभिमान आहे. संपूर्ण मालिकेत त्याने शानदार फलंदाजी केली होती. मी भविष्यवाणी करतोय की, विराट कोहली आपल्याला 2023 विश्वचषकातही तशीच कामगिरी करेल.”

विराट युवा खेळाडूंना करेल मदत
श्रीकांत पुढे बोलताना असेही म्हणाले की, “विराट ईशान किशन याच्यासारख्या खेळाडूंना मदत करेल. ज्याप्रकारे किशनने द्विशतक झळकावले होते. हे स्वातंत्र्याबद्दल आहे. आपल्या खेळाडूंना स्वातंत्र्य देणे, तुम्हाला जे हवंय ते करा, आपला खेळ खेळा. तुम्ही बाद झालात तरी चालेल, संघाचा हाच दृष्टिकोन असला पाहिजे.”

अंतिम सामन्यात गंभीरने केली होती कमाल
गंभीरने 2011च्या विश्वचषकात श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात 97 धावा चोपत भारताला विश्वचषकाची ट्रॉफी उंचावण्यात मदत केली होती. विराट कोहली 2023च्या विश्वचषकात भारतीय संघाच्या मुख्य खेळाडूंपैकी एक असणार आहे. भारतीय संघाला आयसीसी ट्रॉफी जिंकून 9 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. यावर्षी भारतीय संघ हा वनवास संपवणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (cricketer virat kohli 2023 cricket world cup gautam gambhir team india kris srikkanth ind vs sl series)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
डॅनी डॅनियल्सनेही घेतली पाकिस्तान संघाची फिरकी, समालोचकांकडून झाली मोठी चूक
‘दुखापतीनंतर लगेच इंटरनॅशनल क्रिकेट कशाला, आधी…’, नो- बॉलमुळे निशाण्यावर आलेल्या अर्शदीपवर भडकला गंभीर


Next Post
David-Warner

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर वॉर्नर काय करणार? नेटफ्लिक्सने दिला भन्नाट सल्ला

T20-World-Cup-2024

आता 16 नाही, तर 20 संघांसोबत खेळला जाणार टी20 विश्वचषक 2024; सर्व माहिती एकाच क्लिकवर

Brian-Lara-And-Sachin-Tendulkar-And-Virender-Sehwag

समकालीन दिग्गज फलंदाजाच्या प्रश्नावर लाराने घेतले 'या' भारतीयाचे नाव; गोडवे गात म्हणाला, 'नाकातून रक्त...'

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143