---Advertisement---

बाबो! विराटच्या बॅटची ‘एवढी’ किंमत, ‘MRF’कडूनच वर्षाला मिळतात कोट्यवधी रुपये

Virat-Kohli-Bat
---Advertisement---

जागतिक क्रिकेटमधील विक्रमांचा रतीब घालणारा खेळाडू म्हणजे विराट कोहली होय. विराटने 2023ची सुरुवात धूमधडाक्यात केली. त्याने यावर्षी श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत दोन शतके ठोकत विक्रमांमध्ये आणखी भर घातली. त्याच्या शतकाच्या सिंहाच्या वाट्यामुळे भारतीय संघाला वनडे क्रिकेटमधील सर्वात मोठ्या धावसंख्येने जिंकण्याचा विक्रम रचता आला. मात्र, विराटने यादरम्यान जी बॅट वापरली, त्याची किंमत आहे तरी किती? असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला असेल. त्याचबाबत आपण जाणून घेऊयात…

भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत विराट कोहली (Virat Kohli) याने पहिल्या आणि शेवटच्या सामन्यात शतक झळकावले. विराटने शेवटच्या वनडेत 13 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने नाबाद 166 धावा कुटल्या. यादरम्यान विराटच्या बॅटवर जो ब्रँड पाहायला मिळाला, तो एमआरएफ (MRF) आहे. एक- दोन नाही, तर मागील 9 वर्षांपासून विराट कोहली एमआरएफ (Virat Kohli MRF) ब्रँडचे स्टिकर बॅटवर वापरत आहे. विराटने सर्वप्रथम 2014 मध्ये हे स्टिकर त्याच्या बॅटवर लावण्याचा करार एमआरएफसोबत केला होता.

आतापर्यंत विराटने त्याच्या कारकीर्दीत 74 आंतरराष्ट्रीय शतके झळकावली आहेत. विराटच्या बॅटमधून निघणाऱ्या प्रत्येक शतकामागे त्याच्या क्लाससोबतच बॅटचाही मोठा वाटा असतो. विराटच्या एमआरएफ बॅटच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं, तर ते सर्वकाही ग्रेन (बॅटवरील नैसर्गिक रेषा) वर अवलंबून असते.

विराटच्या बॅटची किंमत
इंग्लिश विलो झाडाच्या क्रिकेट बॅटमधील ग्रेननुसारच त्याची किंमत असते. ग्रेनचा संबंध इंग्लिश विलो झाडाच्या वयाशी असतो. विराटच्या बॅटमध्ये 10 ते 12 ग्रेनचा वापर होतो. विराट ज्या बॅटसोबत मैदानावर खेळण्यासाठी उतरतो, त्याची किंमत 17 हजारांपासून सुरू होते. त्याची किंमत 25 ते 30 हजारांपर्यंतही वाढू शकते. विराटच्या बॅटचे वजन हे 1.1 किलोपासून ते 1.26 किलोपर्यंत असते.

वर्षाला घेतो 12.5 कोटी
विराट कोहलीने एमआरएफ ब्रँडसोबत 2017मध्ये 8 वर्षांचा करार केला होता. वृत्तांनुसार, हा करार 100 कोटी रुपयांचा होता. म्हणजेच विराटला एमआरएफ ब्रँडचे स्टिकर बॅटवर लावण्यासाठी वर्षाला 12.5 कोटी रुपये मिळतात.

विराट कोहलीची वनडे कारकीर्द
अशाप्रकारे विराटची बॅटदेखील खूपच महागडी आहे. याच बॅटमधून विराट धावांचा डोंगर रचताना दिसतो. विराटच्या वनडे कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत 268 सामन्यातील 259 डावात फलंदाजी केली आहे. यादरम्यान त्याने 58.24च्या सरासरीने 12754 धावा कुटल्या आहेत. या धावा करताना त्याने 46 शतके आणि 64 अर्धशतकेही झळकावली आहेत. 183 ही त्याची वनडेतील सर्वोत्तम धावसंख्या राहिली आहे. (cricketer virat kohli hits 46th odi century do you price of his bat )

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सूर्यकुमार यादव टी-20त सुपरहिट, पण वनडेत फ्लॉप! तिरुअनंतपुरममध्ये पुन्हा ठरला अपयशी
सिराजच्या भेदक गोलंदाजीपुढे श्रीलंका ढेर! जबरदस्त इनस्विंगवर हसरंगा त्रिफळाचीत

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---