भारतीय क्रिकेटपटू आता क्रिकेटव्यतिरिक्त इतर व्यवसायातही आपला हात आजमावत आहेत. यामध्ये विराट कोहली याचाही समावेश आहे. विराट मैदानाच्या बाहेर एक व्यावसायिक म्हणून झळकत आहे. त्याने मुंबईत रेस्टॉरंटचा व्यवसाय सुरू केला आहे. खरं तर, मागच्या महिन्यात विराटने बॉलिवूडचे दिग्गज गायक किशोर कुमार यांच्या बंगल्यात रेस्टॉरंट सुरू करण्याची योजना आखली होती, जी आता पूर्णत्वास आली आहे.
किशोर कुमार (Kishore Kumar) यांच्या या जुन्या बंगल्याचे नाव ‘गौरी कुंज’ असे होते. मात्र, आता हे ‘वन8 कम्युन’ या नावाने ओळखले जाणार आहे. विराट कोहली (Virat Kohli) याने मागील महिन्यात हा बंगला 5 वर्षांसाठी भाडेतत्वावर घेतला होता. आता हा बंगला काही दिवसांमध्येच रेस्टॉरंटमध्ये बदलल्याचे दिसत आहे. विराटने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करत आपल्या चाहत्यांना या शानदार रेस्टॉरंटची झलक दाखवली आहे. या व्हिडिओत विराटसह अभिनेता मनीष पॉल (Manish Paul) हादेखील दिसत आहे.
https://www.instagram.com/reel/CjU0G_yAPsK/?utm_source=ig_embed&ig_rid=813b0727-8784-4710-850f-cff33c185c44
विराटने गायले किशोर कुमार यांचे गाणे
या व्हिडिओत विराट कोहली मनीषसोबत मस्ती करताना दिसत आहे. विशेष म्हणजे, त्याने रेस्टॉरंटमधील जेवणाबद्दल मनीषला सांगितले आणि सोबतच किशोर कुमार यांचे प्रसिद्ध गाणे ‘मेरे मेहबूब कयामत होगी’ (Mere Mehboob Qayamat Hogi) हे गाणेही गायले. विराटचे हे शानदार रेस्टॉरंट मुंबईच्या जुहू येथे आहे. या व्हिडिओत रेस्टॉरंटमध्ये विराटची 18 नंबरची जर्सीही पाहायला मिळत आहे.
तब्बल 900 कोटींंहून अधिक संपत्तीचा मालक आहे विराट
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, विराटची एकूण संपत्ती ही तब्बल 900 कोटींहून अधिक आहे. त्याने आपला पैसा अनेक व्यावसायात गुंतवला आहे. याव्यतिरिक्त विराट यूएई रॉयल्स नावाच्या एका टेनिस संघाचाही सहसंस्थापक आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एकच मारला, पण कच्चून मारला! पंजाबच्या पठ्ठ्याने भिरकावला 108 मीटरचा गगनचुंबी षटकार, पाहा व्हिडिओ
इकडं सूर्या भाऊंची बॅट तळपली अन् तिकडं पाकिस्तानी फलंदाजाचं टेन्शन वाढलं, टी20 रँकिंगमध्ये घेतली गरुडझेप