आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळाडू आपल्या कामगिरीने अनेक नवनवे विक्रम रचत असतात. फलंदाजी, गोलंदाजी तसेच क्षेत्ररक्षण अशा तिन्ही क्षेत्रात हे विक्रम बनतात. परंतु काही रंजक असे विक्रम असतात जे आपणास माहीत नसतात. अशाच एका आगळ्यावेगळ्या विक्रमा विषयी आपण जाणून घेणार आहोत.
आपण आज क्रिकेटमधील अशा एका विक्रम विषयी जाणून घेणार आहोत ज्याबाबत क्रिकेटप्रेमी अनभिन्न असतील. हा विक्रम म्हणजे सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळून एकही चेंडू गोलंदाजी न करणे.
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने एकही चेंडू न टाकलेले क्रिकेटपटू
१) ऍडम गिलख्रिस्ट-
ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक ऍडम गिलख्रिस्ट या या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. गिलख्रिस्टने आपल्या कारकिर्दीत ३९६ आंतरराष्ट्रीय सामने खेळताना एकही चेंडू गोलंदाजी केली नाही. मात्र, आयपीएलमध्ये त्याने आपल्या अखेरच्या सामन्यात एकच चेंडू टाकला व त्यावर हरभजनसिंग याचा बळी मिळवला.
२) मुशफिकूर रहीम-
बांगलादेशचा अनुभवी यष्टीरक्षक मुशफिकूर रहीम या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर येतो. बांगलादेशचे कर्णधारपद भूषविलेल्या या खेळाडूने आपल्या आत्तापर्यंतच्या जवळपास १४ वर्षाच्या कारकीर्दीत एकही चेंडू गोलंदाजी केली नाही. रहीमने आजतागायत ३८८ आंतरराष्ट्रीय सामन्यात बांगलादेशचे प्रतिनिधीत्व केले आहे.
३) ओएन मॉर्गन-
इंग्लंडमध्ये २०१९ साली झालेल्या वनडे विश्वचषकात इंग्लंडला विजयी बनवणारा कर्णधार ओएन मॉर्गन याने आजतागायत ३६७ आंतरराष्ट्रीय सामने खेळल्यानंतरही एकही चेंडू गोलंदाजी केली नाही. विशेष म्हणजे मॉर्गन यांनी केवळ इंग्लंड नव्हेतर, आयर्लंडचे देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केले आहे.
४) उपुल थरंगा-
तिलकरत्ने दिलशानसोबत श्रीलंका क्रिकेटमधील सर्वोत्तम सलामीवीर राहिलेल्या उपुल थरंगा यानेदेखील आपल्या २९२ सामन्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत एकही चेंडू गोलंदाजी केली नव्हती. थरंगा याने २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती.
५) मोईन खान-
पाकिस्तानचे दिग्गज यष्टीरक्षक व सध्या प्रसिद्ध प्रशिक्षक असलेले मोईन खान या यादीमध्ये पाचव्या क्रमांकावर आहेत. त्यांनी आपल्या संपूर्ण कारकीर्दीत एकही चेंडू गोलंदाजी केली नव्हती. मोईन खान यांनी २८८ आंतरराष्ट्रीय सामने खेळले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
शाहिद आफ्रिदीच्या जावयाचे माजी क्रिकेटरने टोचले कान; म्हणे, ‘विकेट्सपेक्षा जास्त फ्लाइंग किस देतो’