वेस्ट इंडिज दौऱ्यावर भारतीय संघाला मिळालेली नवीन सलामी जोडी शानदार फॉर्ममध्ये आहे. पहिल्या कसोटीत द्विशतकी भागीदारी रचणाऱ्या रोहित शर्मा आणि यशस्वी जयसवाल या जोडीने दुसऱ्या कसोटीतही आपला गड राखला. त्यांनी दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी लंचपर्यंत बिनबाद 121 धावांपर्यंत पोहोचवले होते. यावेळी कर्णधार रोहित 102 चेंडूत 63 धावा, तर जयसवालने 56 चेंडूत 52 धावा केल्या होत्या. यावेळी त्यांच्या शतकी भागीदारी झाली होती. मात्र, लंचनंतर जयसवाल वैयक्तिक 57 धावांवर बाद झाला. जेसन होल्डर याने त्याची विकेट काढली. मात्र, जयसवालने यावेळी मोठा विक्रम नावावर केला.
यशस्वीने रचला इतिहास
यशस्वी जयसवाल याने दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 74 चेंडू खेळून 57 धावा केल्या. या धावा करताना त्याने 1 षटकार आणि 9 चौकारांचाही पाऊस पाडला. अशाप्रकारे त्याने पहिल्या 2 कसोटी डावात 228 धावांचा टप्पा पार केला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सलामीवीराच्या रूपात फक्त एकाच फलंदाजाने पहिल्या 2 डावात जयसवालपेक्षा जास्त धावा केल्या. तो फलंदाज इतर कुणी नसून इंग्लंडचे माजी खेळाडू डेविड लॉयड (David Lloyd) आहेत.
डेविड लॉयड यांनी पहिल्या 2 कसोटी डावात एकूण 260 धावा केल्या होत्या. त्यांनी पहिल्या कसोटीत 46 धावा आणि दुसऱ्या कसोटीत नाबाद 214 धावा केल्या होत्या. या दोन्ही खेळी त्यांनी भारताविरुद्ध खेळल्या होत्या. तसेच, त्यांच्या संघाला या दोन्ही सामन्यात मिळवण्यात यश आले होते.
Lunch on Day 1 of the second Test 🍱
A solid morning session for #TeamIndia 🇮🇳 as we move to 121/0 💪
Stay tuned for the second session of the day!#WIvIND
Scorecard – https://t.co/P2NGagSzo5…… #WIvIND pic.twitter.com/p2P5QboPgf
— BCCI (@BCCI) July 20, 2023
यशस्वीचा पहिला सामना
जयसवालने वेस्ट इंडिजविरुद्ध डॉमिनिका येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीतून पदार्पण केले होते. पदार्पणाच्या कसोटीतच जयसवालने 387 चेंडूत 171 धावांची झंझावाती शतकी खेळी साकारली होती. त्यामध्ये 1 षटकार आणि 16 चौकारांचा समावेश होता. अशाप्रकारे त्याने धडाक्यात आपले आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण केले होते. अशात त्याने कारकीर्दीच्या दुसऱ्या सामन्यातही अर्धशतक ठोकून आपला इरादा स्पष्ट केला आहे.
विशेष म्हणजे, भारताकडून पहिल्या दोन डावात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये जयसवालने तिसरा क्रमांक पटकावला. या यादीत 288 धावांसह रोहित शर्मा पहिल्या स्थानी आहे. त्याने 177 आणि 111 अशा धावा केल्या होत्या. तसेच, दुसऱ्या स्थानी सौरव गांगुली असून त्याने 171 आणि 57 अशा 267 धावा केल्या होत्या. याव्यतिरिक्त शिखर धवन चौथ्या स्थानी असून त्याने पहिल्या डावात 187 आणि दुसऱ्या डावातील 23 धावा मिळून एकूण 210 धावा केल्या होत्या. याव्यतिरिक्त पाचव्या स्थानी पृथ्वी शॉ असून त्याने 134 आणि 70 धावांसह दोन डावात 204 धावा केल्या होत्या. (cricketer yashasvi jaiswal becomes 2nd opener who scored most runs in first 2 inns in test)
पहिल्या दोन कसोटीत भारतासाठी सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
288- रोहित शर्मा (177, 111*)
267- सौरव गांगुली (132, 136)
228- यशस्वी जयसवाल (171, 57)*
210- शिखर धवन (187, 23)
204- पृथ्वी शॉ (134, 70)
महत्त्वाच्या बातम्या-
त्रिनिदादचा पहिला दिवस भारताच्या नावावर, विराट-जडेजाने फोडली विंडीजची गोलंदाजी; शतकाची प्रतीक्षाही संपणार!
रोहितची विंडीजवर दादागिरी सुरूच! आक्रमक अर्धशतकासह बनवली दमदार आकडेवारी