भारतात प्रत्येक सणाला एक वेगळे आणि खूपच विशेष असे महत्त्व असते. त्यापैकीच एक सण म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण आपल्या भावाला राखी बांधून त्याला दीर्घायुष्य मिळावे यासाठी प्रार्थना करते तर भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षणाचे वचन देतो. अगदी बहिण-भावाप्रमाणे भाऊ-भाऊही या दिवशी एकमेकांप्रती प्रेम व्यक्त करत असतात. क्रिकेट क्षेत्रातही बंधू-भगिनीतील बांधिलकीची अनेक उदाहरणे आहेत. अगदी भारतीय संघातील हार्दिक आणि कृणाल पंड्या, दिपक आणि राहुल चाहर, इरफान आणि युसूफ पठाण या बंधूंच्या जोड्या एकमेकांवर जीव ओवाळून टाकतात.
मात्र असेही काही प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू आहेत, ज्यांचे भाऊ मात्र फार क्वचितच जणांना माहिती आहेत. अशाच काही भावांच्या जोड्यांबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
१. सचिन तेंडूलकर आणि त्याचे भाऊ
‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडूलकर याची ख्याती जगभरात आहे. आपल्या फलंदाजीने विक्रमांची रास घालणाऱ्या या दिग्गजाला ३ मोठे भाऊ-बहिण आहेत. अजित तेंडूलकर, नितीन तेंडूलकर हे २ भाऊ आणि सविता तेंडूलकर ही त्याची बहिण आहे. जरी त्याची भावंडे सावत्र असली तरीही सचिन त्यांना आपलेसे मानतो.
२. राहुल द्रविड आणि विजय द्रविड
माजी भारतीय क्रिकेटपटू राहुल द्रविड हा त्याच्या बचावात्मक खेळीमुळे भारतीय संघाची ‘द वॉल’ म्हणून ओळखला जातो. भलेही त्याचा भाऊ विजय द्रविड जास्त प्रसिद्ध नसला तरीही त्यांच्यामध्ये खूप चांगले नाते आहे. विजयने भाऊ राहुलला त्याची क्रिकेट कारकिर्द घडवण्यात मोठा हातभार लावला आहे. ते नेहमी एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात.
३. युवराज सिंग आणि जोरावर सिंग
भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंग याला त्याच्या विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखले जाते. मात्र युवराजचा भाऊ जोरावर सिंग हा फारसा कुणाला माहिती नाही. जोरावरने अभिनय क्षेत्रात हात आजमावला पण त्याला म्हणावे तसे यश मिळाले नाही.
https://www.instagram.com/p/B88JmhEjz8P/?utm_source=ig_web_button_share_sheet
४. विराट कोहली आणि विकास कोहली
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि ‘रनमशीन’ विराट कोहली याच्या भावाचे नाव विकास कोहली आहे. तो विराटचा मोठा भाऊ आहे. विकासही अगदी विराटप्रमाणे आपल्या तंदुरुस्तीवर खूप लक्ष देतो. तो एक संगीत निर्माता आहे. तो जॅझ, हिप हॉप, पंक, मेटल, काउंट्री आणि बॉलिवूड पॉप असे वेगवेगळे संगीत तयार करतो. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास, विकासच्या पत्नीचे नाव चेतना कोहली आहे. त्यांना अर्णव कोहली नावाचा मुलगाही आहे.
https://www.instagram.com/p/BrzPtx9g86P/?utm_source=ig_web_button_share_sheet
५. रोहित शर्मा आणि विशाल शर्मा
‘हिटमॅन’ रोहित शर्मालाही विशाल शर्मा नावाचा भाऊ आहे. तो सुरुवातीला हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात कार्यरत होता. पण पुढे रोहितने त्याला आपले भारत आणि सिंगापूरमधील क्रिकेट अकादमींचे कामकाज पाहण्यास सांगितले. तेव्हापासून तो रोहितचा कारभार सांभाळतो.
महत्त्वाच्या बातम्या-
रक्षाबंधन विशेष: १० भारतीय क्रिकेटपटू आणि त्यांच्या लाडक्या बहिणी
रक्षाबंधन विशेष: जगातील प्रसिद्ध भाऊ जे देशासाठी खेळले एकत्र क्रिकेट