fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

क्रोएशियाने फ्रेंच फोटोग्राफरला देशात फिरण्यासाठी दिले आमंत्रण

क्रोएशिया विरुद्ध इंग्लड या सामन्यादरम्यान जल्लोष करणाऱ्या खेळाडूंमध्ये अडकलेल्या फ्रेंच फोटोग्राफरला क्रोएशियाने देशात पर्यटन करण्याची संधी दिली आहे.

युरी कोर्टेझ असे या फोटोग्राफरचे नाव असून ते फ्रान्स प्रेसमध्ये काम करतात. फिफा विश्वचषकात इंग्लड विरुद्धच्या सामन्यात मारियो मॅन्ड्झूकिचने केलेल्या गोलनंतर खेळाडू जल्लोष करत असताना फोटो काढण्यासाठी गेलेले कोर्टेझ जमिनीवर पडले.

म्हणूनच मी अंतिम सामन्यात क्रोएशियाला पाठिंबा दिला- कोर्टेझ 

मेक्सिकोचे रहिवासी असलेले 53वर्षीय कोर्टेझ यांना क्रोएशियन सरकारने त्यांच्या कुटुंबासोबत देशात फिरण्यास परवानगी दिली आहे.

“मी याआधी कधीही क्रोएशियाला गेलो नाही त्यामुळे तिथे जाण्याची ही चांगली संधी आहे. म्हणून मी हे आमंत्रण स्विकारतो”, असे कोर्टेझ म्हणाले.

“इंग्लडच्या सामन्यादरम्यान खेळाडूंनी केलेला जल्लोष बघून माझे क्रोएशियाशी एक नाते जुळले आहे. यामुळेच मी अंतिम सामन्यात क्रोएशियाच्या संघाला पाठिंबा दिला”, असेही ते पुढे म्हणाले.

कोर्टेझ कुटुंबीय या प्रवासाला ऑगस्ट किंवा सप्टेंबर दरम्यान सुरूवात करू शकतात.

“त्यांच्या प्रवासाला झॅग्रेबपासून सुरूवात होणार आहे. आम्ही त्यांना देशाचे सौंर्द्य, बेटे तसेच प्रसिद्ध ठिकाणे दाखवणार आहोत”, असे क्रोएशिया राष्ट्रीय पर्यटक मंडळाचे संचालक क्रिस्टीजॅन स्टॅनीच म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

क्रोएशियाच्या या फुटबॉलपटूचा विश्वचषकाचे रौप्यपदक घेण्यास नकार

क्रोएशियाचा हा फुटबॉलपटू दुर्घटनेतून थोडक्यात वाचला

You might also like