बुधवारी(११ नोव्हेंबर) फुटबॉल जगतात खळबळ उडवणारी घटना घडली. क्रोएशिया विरुद्ध तुर्की संघात बुधवारी झालेल्या मैत्रीपूर्ण सामन्यात क्रोएशियाचा डिफेंडर डोमगोज विदाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्याला सामना अर्धवट सोडावा लागला. याबद्दल क्रोएशियाच्या फुटबॉल असोसिएशनने माहिती दिली आहे.
सोमवारी(९ नोव्हेंबर) विदासह सर्व क्रोएशियाच्या खेळाडूंचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. पण त्यानंतर पुन्हा बुधवारी इस्तांबुल येथे होणाऱ्या सामन्याआधी सकाळी खेळाडूंची कोरोना चाचणी घेण्यात आली होती.
त्यानंतर विदाने क्रोएशियाकडून कर्णधार म्हणून सामना खेळायला सुरुवात केली होती. पण मध्यंतरानंतरचा खेळ सुरु होण्याआधी क्रोएशियाच्या संघ व्यवस्थापनाला विदाच्या पॉझिटिव्ह कोरोना अहवालाबद्दल माहिती देण्यात आली. त्यामुळे लगेचच फ़िलिप उर्मोविकला विदाच्या जागेवर खेळवण्यासाठी आणले. तर विदाला संघापासून वेगळे करण्यात आले. त्यामुळे विदा मध्यंतरानंतरचे सत्र खेळला नाही.
क्रोएशियाने सांगितले आहे की विदा इस्तांबुलमध्ये काहीदिवसांसाठी एकांतवासात राहिल. तर क्रोएशियाचा संघ स्टॉकहोमला रवाना होईल. तुर्की विरुद्धचा क्रोएशियाचा सामना ३-३ असा बरोबरीत सुटला.
महत्त्वाच्या बातम्या –
धक्कादायक! ‘या’ जागतिक फूटबॉलपटूच्या मेंदूत गाठी, लवकरच करावी लागणार शस्त्रक्रीया
ला लीगा: बार्सिलोनाच्या स्टार फुटबॉलर मेस्सीचा नकोसा पराक्रम
क्रिस्टियानो रोनाल्डोची कोरोनावर मात; युव्हेंट्स संघाने दिली माहिती